Sugarcane Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : नांदेड विभागात २८ कारखान्यांना गाळप परवाना

Sugarcane Season : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे नांदेड विभागातील गाळप हंगाम २०२३-२४ साठी २९ साखर कारखान्यांनी गाळप परवानासाठी अर्ज सादर केले होते.

Team Agrowon

Nanded News : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे नांदेड विभागातील गाळप हंगाम २०२३-२४ साठी २९ साखर कारखान्यांनी गाळप परवानासाठी अर्ज सादर केले होते. यातील २८ साखर कारखान्यांना नियम अटींची पुर्तता केल्यामुळे राज्याच्या साखर आयुक्तांनी गाळप परवाने दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याला अद्याप गाळप परवाना मिळाला नसल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली.

नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे नांदेड विभागात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड विभागात मागीलवर्षी ३० साखर कारखाने सुरू झाले होते. यात १९ खासगी, तर ११ सहकारी कारखान्यांचा समावेश होता.

२०२३-२४ या वर्षाचा गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू यासाठी नांदेड विभागातील २९ कारखान्यांनी गाळप हंगामासाठी नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या मार्फत साखर आयुक्तांकडे गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले होते. यात २१ खासगी, तर ८ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. २८ कारखान्यांना परवाना मिळाला आहे.

गाळपासाठी अर्ज केलेले कारखाने

१) ट्वेंटीवन शुगर युनिट-१ लातूर २) विलास सहकारी साखर कारखाना-२ तोंडार, ३) रेणा सहकारी साखर कारखाना, ४) योगेश्वरी शुगर, ५) श्री तुळजाभवानी शुगर ६) कपीश्वर शुगर ७) श्री लक्ष्मी नरसिंह शुगर ८) श्री रेणुका शुगर ९) गंगाखेड शुगर १०) श्री संत शिरोमणी मारोती महाराज ११) एमव्हीके शुगर १२) श्री सुभाष शुगर १३) मांजरा सहकारी साखर कारखाना १४) विलास यू -१ निवळी, १५) कुंटूरकर शुगर

१६) शिऊर शुगर १७) जागृती शुगर, १८) ट्वेंटीवन शुगर यु-२ १९) ट्वेंटीवन शुगर यू-३ २०) पूर्णा सहकारी साखर कारखाना २१) शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी २२) ओंकार शुगर २३) बळीराजा शुगर २४) श्री साईबाबा शुगर २५) भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना यू -१, २६) भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना यू -२ २७) सिद्धी शुगर २८) शिवाजी सर्विस स्टेशन.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT