Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Shortage : राहुरी कृषी विद्यापीठात २७ हजार टन चारा विक्रीस

MPKV Rahuri : नगर जिल्ह्यात यंदा अनेक गावांत दुष्काळीस्थिती आहे. त्यामुळे चारा, पाणीटंचाईला पशुपालकांना सामोरे जावे लागले.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात १०४ एकरांवर सुमारे २७ हजार टन चारा विक्रीसाठी तयार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा चारा उपलब्ध असून, १२०० रुपये प्रतिटन दराने चारा खरेदी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यात यंदा अनेक गावांत दुष्काळीस्थिती आहे. त्यामुळे चारा, पाणीटंचाईला पशुपालकांना सामोरे जावे लागले. त्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या भागात शेतकऱ्यांनी चारा लागवडीवर भर दिला. मुरघासामुळेही अनेक भागात चाराटंचाईवर मात करता आली. प्रशासनानेही चारा उत्पदानावर भर दिला.

त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने विद्यापीठात १०४ एकरांवर गोधन ज्वारीच्या कडवळाची पेरणी केली होती. आता हा चारा विक्रीसाठी उपलब्ध आहे. १२०० रुपये प्रतिटन दर असून, कापणी व वाहतूक संबंधित शेतकऱ्यांनी करायची आहे.

नगर जिल्ह्यातील ज्या पशुपालकांना चाऱ्याची आवश्यकता असेल अशा पशुपालकांनी प्रमुख शास्‍त्रज्ञ (बियाणे), बियाणे विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्याशी संपर्क साधून हिरव्या चाऱ्याची स्वत: कापणी करून, रक्कम विद्यापीठाकडे जमा करून चारा घेऊन जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

...तर काही मंडळात चाराटंचाई

पावसाळा सुरू झाला आहे. अनेक भागांत पाऊसही पडला आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर साधारण २० ते पंचवीस दिवसांत गवत व अन्य चारा उपलब्ध होते. सध्या गवत, झाडेझुडपे हिरवी झाल्याने शेळ्या-मेंढ्याच्या चाऱ्याचा प्रश्‍न मिटला आहे. मात्र जनावरांसाठी अल्प चारा उपलब्ध असलेल्या मंडलात पाऊस आखाडला तर चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

प्रामुख्याने पारनेरमधील भाळवणी, पळशी, श्रीगोंद्यातील मांडवगण, भानगाव, कर्जतमधील मिरजगाव, कोंभळी, वालवड, पाथर्डीमधील पाथर्डी, शेवगावमधील बोधेगाव, नेवाशातील सलाबतपुर, संगमनेमधील तळेगाव आणि नगर तालुक्यातील सर्वच मंडलांत पंधरा ते वीस दिवस पुरेस एवढा चारा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT