Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : गाळपासाठी नांदेड विभागातील २५ साखर कारखान्यांना परवाना

Sugarcane Factory : नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०२४-२५ साठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे गाळप परवानासाठी अर्ज सादर केले आहेत.

Team Agrowon

Nanded News : नांदेड : नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०२४-२५ साठी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे गाळप परवानासाठी अर्ज सादर केले आहेत. यातील २५ कारखान्यांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळाची थकित रक्कम भरल्यामुळे त्यांना गाळप परवाना मिळाला आहे.

तर विभागातील चार कारखान्यांचा परवाना प्रलंबित असल्याची माहिती प्रादेशीक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली. नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे नांदेड विभागात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड विभागात मागीलवर्षी २९ साखर कारखाने सुरू झाले होते. यात १९ खासगी तर १० सहकारी कारखान्यांचा समावेश होता.

२०२४-२५ चा गाळप हंगाम लवकरच सुरू होत आहे. यासाठी विभागातील कारखान्यांनी नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे परवान्यासाठी अर्ज केले. परंतु यंदा गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची थकित रक्कम भरलेल्या साखर कारखान्यांचे अर्ज राज्याच्या साखर आयक्तां ु कडे गाळप परवान्यासाठी पाठविण्याचे निर्देश दिले होते.

यामुळे नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने २५ कारखान्यांचे अर्ज परवान्यासाठी पाठविले होते. या सर्व २५ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला. तर चार कारखान्यांकडे महामंडळाची रक्कम थकित असल्यामुळे त्यांचा परवाना प्रलंबित असल्याची माहिती रावल यांनी दिली.

गाळप परवाना मिळालेल्या कारखान्यांत जी ७ शुगर लि. माखणी (ता. गंगाखेड), योगेश्वरी शुगर इंडस्टरी्ज लि. लिंबा (ता. पाथरी), श्री रेणुका शुगर लि. (ता. पाथरी), कपीश्वर शुगर अँड केमिकल लि. जवळा बाजार (ता. औंढा), विलास सहकारी साखर कारखाना लि. तोंडार (ता. उदगीर), एमव्हीके अग्रो फूड प्रोडक्ट लि. वाघलवाडा (ता. उमरी), शिवाजी सर्व्हिस स्टेशन शुगर युनिट बऱ्हाळी (ता. मुखेड), ओंकार शुगर लि. (निलंगा), शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव-येळेगाव (ता. अर्धापूर),

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना युनिट दोन डोंगरकडा (ता. कळमनुरी), पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमतनगर, शिऊर साखर कारखाना लि. वाकोडी, श्री सुभाष शुगर प्रा. लि. हडसणी (ता. हदगाव), कुंटूरकर शुगर अँड ॲग्रो प्रायव्हेट, कुंटूर (ता. नायगाव), संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना बेलकुंड, रेणा सहकारी साखर कारखाना निवडा (ता. रेणापूर), बळीराजा साखर कारखाना लि. कारखेड (ता. पूर्णा), ट्टीवन वें शुगर लि. सायखेडा (ता. सोनपेठ),

जागृती शुगर ऑनलाइन इंडस्टरी्ज लि. (ता. देवणी), विलास सहकारी साखर कारखाना वैशालीनगर निवळी (ता. लातूर), सिद्धी शुगर अलाईड इंडस्टरी्ज लि. उजना (ता. अहमदपूर), श्री साईबाबा शुगर्स लि. शिवनी (ता. औसा), तुळजाभवानी शुगर लि. (ता. सेलू) यांचा समावेश आहे. तर ट्टीवन शुगर वें लि. शिवनी (ता. लोहा), विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखाना लातूर, श्री लक्ष्मी नरसिंह शुगर एलएलपी अमडापूर (ता. परभणी) व टोकाई सहकारी कारखाना लि. कुरुंदा (ता. वसमतनगर) यांना परवाना मिळाला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT