Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : भात नुकसानीपोटी २५ टक्के अग्रिम मिळणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे पीकविमा कंपनीला आदेश

Advance Crop Insurance : भात पिकासाठी पीकविमा नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के अग्रिम शेतकऱ्यांना अदा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला दिले आहेत.

Team Agrowon

Pune News : ‘पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०२३’ अंतर्गत हंगामातील पुरंदर तालुक्यातील भात पिकासाठी पीकविमा नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के अग्रिम शेतकऱ्यांना अदा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला दिले आहेत.

तीव्र दुष्काळ स्थिती, पावसातील ३-४ आठवड्यांपेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, तापमानातील असाधारण घट, वाढ, पर्जन्यमानातील असाधारण प्रमाण, मोठ्या प्रमाणात कीड, रोगांचा प्रादुर्भाव व इतर नैसर्गिक आपत्ती, पूर, परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र बाधित होणे या प्रातिनिधिक सूचकांच्या आधारे नुकसान भरपाईबाबत अधिसूचना काढण्याची तरतूद आहे.

पावसात ३ ते ४ आठवड्यांपेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण, पर्जन्यातील असाधारण प्रमाणाच्या आधारे राज्य शासनाचे अधिकारी आणि विमा कंपनी प्रतिनिधींच्या संयुक्त पाहणीनुसार भात पिकाचे अपेक्षित उत्पादन हे पिकाच्या मागील ७ वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी येणार असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार संबंधित महसूल मंडळ गटातील सर्व पीकविमाधारकांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम १ महिन्याच्या आत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड, राजेवाडी, भिवडी, परिंचे, वाल्हे व शिवरी या भात पिकासाठी अधिसूचित महसूल मंडलांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. सासवड, राजेवाडी महसूल मंडळ गटामध्ये मागील ७ वर्षांची सरासरी उत्पादकता २३११.६० किलो प्रतिहेक्टरी आहे.

संयुक्त सर्वेक्षणानुसार १८४.९२ किलो प्रतिहेक्टरी उत्पादन अपेक्षित आहे. भिवडी महसूल मंडळ गटात मागील ७ वर्षांची सरासरी उत्पादकता २३७३.६० किलो प्रतिहेक्टरी आहे. संयुक्त सर्वेक्षणानुसार ७०४.३३ किलो प्रतिहेक्टरी उत्पादन अपेक्षित आहे. तसेच परिंचे, वाल्हे व शिवरी महसूल गटात मागील ७ वर्षांची सरासरी उत्पादकता २२६७ किलो प्रतिहेक्टरी आहे. या ठिकाणी संयुक्त सर्वेक्षणानुसार ७६०.५४ किलो प्रतिहेक्टरी उत्पादन अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT