Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : ‘कर्जमुक्ती’अंतर्गत २५ कोटींवर प्रोत्साहन अनुदान जमा

जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार २५७ लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात २५ कोटी ६४ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

Team Agrowon

Hingoli News : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत (Mahatma Phule Farmers Debt Relief Scheme) पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १० हजार २५७ लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात २५ कोटी ६४ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय त्रैमासिक आढावा बैठक ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे जिल्हा अग्रणी अधिकारी नरसिंग कल्याणकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक संजय नवसारे, आरसेटीचे संचालक धनाजी बोईले, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक एस. डी. सावंत, सर्व बँकाचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पापळकर म्हणाले, की चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यामध्ये २८ फेब्रुवारी अखेर १ लाख ३६ हजार ६३९ शेतकऱ्यांना ९३१ कोटी रुपयाचे पीककर्जवाटप करत ७६.८२ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. पीककर्जवाटपात मागील पाच वर्षांतील उच्चांकी कर्जवाटप आहे.

ही बाब अभिनंदनीय आहे. पीककर्जाचे नूतनीकरण दरवर्षी ३० जूनपर्यंत केल्यास शासनामार्फत ३ लाख रुपयांपर्यंतच्या पीककर्जावर व्याज परतावा देण्यात येतो.

वेळेवर पीक कर्जाचे नूतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून शेती संलग्न व्यवसायासाठी कर्ज पुरवठा प्राधान्याने करण्यात यावा, अशा सूचनापापळकर यांनी दिल्या.

५४१ कोटी रुपयांवर कर्जे थकित...

जिल्ह्यातील सर्व बँकांनी मिळून विविध क्षेत्रांसाठी ३ हजार ५९३ कोटी ४१ लाख रुपयाचे कर्जवाटप केले आहे.

त्यापैकी शेती व्यवसायासाठी पीककर्ज व मुदत कर्ज मिळून १ हजार ८३५ कोटी ८३ लाख रुपये, लघू व मध्यम उद्योगासाठी २८७ कोटी ११ लाख रुपये शैक्षणिक कर्जासाठी १९ कोटी ८ लाख रुपये, गृहकर्जासाठी ३५० कोटी ८१ लाख रुपये इतर कर्जांमध्ये १ हजार १०० कोटी ५८ लाख रुपये एवढे कर्जवाटप केले आहे.

जिल्ह्यातील सर्व बँकांकडे मिळून ५४१ कोटी ३४ लाख रुपये थकित असून, त्यामध्ये सर्वांत जास्त ४५९ कोटी ६० लाख रुपये हा शेती व्यवसायासाठी दिलेल्या पीककर्ज आणि मुदत कर्जाचा समावेश आहे अशी माहिती सावंत यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT