Farmer Accidental Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Accidental Insurance : शेतकरी अपघात विमा योजनेसाठी २३ कोटींवर निधी उपलब्ध

Insurance Scheme Update : या योजनेतील लाभार्थींना वितरित करण्यासाठी २३ कोटी ३७ लाख रुपये इतका निधी मंगळवारी (ता. २०) उपलब्ध करून देण्यात आला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतर केल्यानंतर प्रथमच या योजनेतील लाभार्थींना वितरित करण्यासाठी २३ कोटी ३७ लाख रुपये इतका निधी मंगळवारी (ता. २०) उपलब्ध करून देण्यात आला.

या योजनेतील खंडित कालावधीत अपघात होऊन मृत्यू पावलेल्या परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री श्री. मुंडे यांच्या परळी येथील संपर्क कार्यालयात जनता दरबार उपक्रमांतर्गत भेट घेतली होती. त्या वेळी निधीअभावी लाभ मिळाला नसल्याचे कृषिमंत्री यांना अवगत केले होते.

त्यानंतर श्री. मुंडे यांनी या योजनेचा संपूर्ण आढावा घेऊन खंडित कालावधीतील राज्यातील सर्व प्रकरणे निकाली काढत त्यासाठी ४९ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर बदललेल्या योजनेतील २३ कोटी रुपये अनुदान देखील उपलब्ध करून दिले. पूर्वी ही योजना ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना या नावाने ओळखली जायची व या अंतर्गत विमा सुरक्षा म्हणून अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना अपघातातील उपचारासाठी किंवा मृत्युपश्चात त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिकसाह्य म्हणून ठरावीक रक्कम देण्यात येत होती.

मात्र कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या काळात या योजनेचे विमा योजनेतून सानुग्रह अनुदान योजनेत रूपांतर करण्यात आले. यादरम्यानच्या खंडित कालावधीतील अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना काही दिवसांपूर्वीच कृषिमंत्री श्री मुंडे यांच्या माध्यमातून तब्बल ४९ कोटी रुपये लाभाचे वितरण करण्यात आले होते.

त्यानंतर आता योजना नव्या रूपाने सुरू झाल्यापासूनच्या काळातील प्रलंबित प्रकरणे निकाली लावून त्यांच्या कुटुंबीयांना लाभाचे वितरण करण्यासाठी २३ कोटी ३७ लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती कृषिमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT