Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : रत्नागिरीत २२ हजार शेतकऱ्यांनी उतरविला पीकविमा

Rabi Season Crop Insurance : २०२३-२४ या हंगामासाठी यंदा ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत होती. त्यामध्ये आतापर्यंत २२ हजार २२३ शेतकऱ्यांनी १२ हजार ६१८.८ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला.

Team Agrowon

Ratnagiri News : प्रतिकूल हवामानापासून फळपिकाचे संरक्षण करण्यासाठी लागू केलेल्या पीकविमा योजनेत कोकणातील काजू व आंबा पिकांचा समावेश आहे. २०२३-२४ या हंगामासाठी यंदा ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत होती. त्यामध्ये आतापर्यंत २२ हजार २२३ शेतकऱ्यांनी १२ हजार ६१८.८ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला.

गेले काही दिवस ऑनलाइन नोंदणीच्या वेबसाइटला अडचण होत असल्यामुळे काही लाभार्थी शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी आंबा बागायतदारांकडून केली जात आहे. गतवर्षी ३२ हजार ३९८ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता. यंदा दहा हजार शेतकरी कमी नोंदले गेले आहेत.

शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठीचा पर्याय म्हणून कृषी विभागामार्फत दरवर्षी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येते. यंदाच्या आंबिया बहरासाठी योजनेत सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू झाले आहे. जिल्ह्यामध्ये अधिसूचित केलेल्या महसूल मंडलात आंबा, काजू पिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण देण्यात येईल.

जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील २२ हजार २२३ शेतकऱ्यांनी १२ हजार ६१८.१९ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला.

शेतकऱ्यांमध्ये कर्जदार शेतकरी २० हजार ६०१ तर बिगर कर्जदार शेतकरी १ हजार ६२२ आहेत. विम्याच्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी १४ कोटी ७० लाख ६३ हाजर ६७५ रुपये भरले आहेत. तर विमा संरक्षित रक्कम १६६ कोटी ५५ लाख रुपये आहे.

वेबसाइटला आलेल्या अडचणींसह यंदा विमा परतव्याची रक्कम उशिरा प्राप्त झाल्यामुळे बागायतदारांकडे हप्ता भरण्यास पैसे नव्हते. त्यामुळे यंदा प्रतिसाद कमी मिळाला आहे. विमा हप्ता भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शासनाकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे.- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT