Loan Waive Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानापासून २२ हजारांवर शेतकरी वंचित

Farmer Loan Waive Scheme : राज्य शासनाने दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्याबरोबरच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्‍त योजनेतूनच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याची तरतूद करण्यात आली होती.

Team Agrowon

Yavatmal News : सेवा सोसायटीतील कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांची माहितीच प्रोत्साहन योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली नाही. त्याचा फटका बसत तब्बल २२ हजारांवर शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या शेतकऱ्यांना विधानसभा आचारसंहितेच्या पूर्वी लाभ मिळावा, अशी मागणी प्रयोगशील शेतकरी मनीष जाधव यांनी केली आहे.

कोरडवाहू पीकपद्धती, पारंपरिक पिकांवरील अवलंबित अशा अनेक कारणांमुळे वाढते नैराश्‍य व त्यातून होणाऱ्या शेतकरी आत्महत्या या साऱ्याच्या परिणामी शेतकरी आत्महत्याग्रस्त अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे. याच जिल्ह्यात जिल्हा बॅंक अंतर्गत असलेल्या सेवा सोसायटीच्या कारभारापायी शेतकऱ्यांवर कर्ज भरणा केल्यानंतर मिळणाऱ्या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

राज्य शासनाने दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्याबरोबरच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले कर्जमुक्‍त योजनेतूनच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्याची तरतूद करण्यात आली होती. यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे ८७ हजार सभासद आहेत. त्यातील ६४ हजारांवर सभासद हे प्रोत्साहन अनुदानासाठी प्राप्त ठरले.

त्यानंतरच्या काळात विविध कारणांमुळे यातील ८ हजारांवर शेतकरी सभासदांना अपात्र ठरविण्यात आले. मात्र २२ हजारांवर शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले असताना सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांची यादीच संबंधित योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली नाही. त्या कारणामुळे या शेतकऱ्यांवर प्रोत्साहन लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. डाटा संकलनातील चुकीचा फटका या शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप केला जात आहे.

कर्जदार शेतकऱ्यांना यापूर्वीच कर्जमाफी मिळाली. मात्र नियमित कर्ज भरणाऱ्यांना अद्याप प्रोत्साहन अनुदान देण्यात आले नाही. त्यावरूनच शासनाच्या दुटप्पी धोरणाचा पर्दाफाश होतो. नियमित कर्ज भरू नका ! कदाचित असेच या शासनाला अपेक्षित आहे. त्यामुळेच प्रोत्साहन योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यासाठी विविध क्‍लृप्त्या वापरण्यात येत आहेत.
- मनीष जाधव, प्रयोगशील शेतकरी, वागद, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT