Wave Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

Rain Update : यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा २२ वेळा उसळण्याची शक्यता आपत्कालीन विभागाने व्यक्त केली आहे.

Team Agrowon

Mumbai News : यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा २२ वेळा उसळण्याची शक्यता आपत्कालीन विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे हे दिवस धोक्याचे असून मोठ्या भरतीच्या दिवसांत नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. यंदाचा पावसाळा लवकर सुरू होईल, असे संकेत हवामान खात्याकडून मिळत आहेत.

पावसाळ्यात जून महिन्यातील सात दिवस, जुलै महिन्यातील चार दिवस, ऑगस्ट महिन्यातील पाच दिवस, तर सप्टेंबर महिन्यातील सहा दिवस धोक्याचे आहेत. यापैकी सर्वाधिक उंच लाटा या २० सप्टेंबरला मध्यरात्री एक वाजून तीन मिनिटांनी उसळणार असून या लाटांची उंची ४.८४ मीटर इतकी असे, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली आहे. मोठ्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

भरतीच्या मोठ्या लाटा कधी?

वार तारीख- वेळ- उंची (मीटरमध्ये)

जून

बुधवार ५ सकाळी ११.१७ वा. ४.६१

गुरुवार ६ दुपारी १२.०५ वा. ४.६९

शुक्रवार ७ दुपारी १२.५० वा. ४.६७

शनिवार ८ दुपारी ०१.३४ वा. ४.५८

रविवार २३ दुपारी ०१.०९ वा. ४.५१

सोमवार २४ दुपारी ०१.५३ वा. ४.५४

मंगळवार २५ दुपारी ०२.३६ वा. ४.५३

जुलै

सोमवार २२ दुपारी १२.५० वा. ४.५९

मंगळवार २३ दुपारी १.२९ वा. ४.६९

बुधवार २४ दुपारी २.११ वा. ४.७२

गुरुवार २५ दुपारी २.५१ वा. ४.६४

ऑगस्ट

सोमवार १९ सकाळी ११.४५ वा. ४.५१

मंगळवार २० दुपारी १२.२२ वा. ४.७०

बुधवार २१ दुपारी १२.५७ वा. ४.८१

गुरुवार २२ दुपारी १.३५ वा. ४.८०

शुक्रवार २३ दुपारी २.१५ वा. ४.६५

सप्टेंबर

मंगळवार १७ सकाळी ११.१४ वा. ४.५४

बुधवार १८ सकाळी ११.५० वा. ४.७२

गुरुवार १९ मध्यरात्री ००.१९ वा. ४.६९, दुपारी १२.२४ वा. ४.७८

शुक्रवार २० मध्यरात्री १.०३ वा. ४.८४, दुपारी १.०२ वा. ४.७०

शनिवार २१ मध्यरात्री १.४७ वा. ४.८२, दुपारी १.४२ वा. ४.५०

रविवार २२ मध्यरात्री २.३३ वा. ४.६४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT