Soybean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Payment : सोयाबीनचे २२ कोटी ५ लाख रुपये चुकारे अदा

Soybean Rate : परभणी जिल्ह्यात १२ खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी १२ हजार ६९० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी असून १० खरेदी केंद्रांवर १ हजार ८४१ शेतकऱ्यांचे ३२ हजार ८९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.

Team Agrowon

Parbhani News : किंमत आधार योजनेअंतर्गत हमीभावाने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये)राज्य सहकरी पणन महासंघअंतर्गत परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील २५ केंद्रांवर गुरुवार (ता. १२) पर्यंत ४ हजार ८४६ शेतकऱ्यांचे ८८ हजार ७९८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले.

या सोयाबीनची किंमत ४३ कोटी ४४ लाख ३०५ रुपये होते. त्यापैकी १५ केंद्रांवरील २ हजार ४२५ शेतकऱ्यांना ४५ हजार ७३ क्विंटल सोयाबीनचे २२ कोटी ५ लाख १ हजार ९५९ रुपये चुकारे अदा करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात १२ खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी १२ हजार ६९० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी असून १० खरेदी केंद्रांवर १ हजार ८४१ शेतकऱ्यांचे ३२ हजार ८९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. त्यापैकी ९ केंद्रांवरच्या १ हजार १२४ शेतकऱ्यांना १८ हजार २१ क्विंटल सोयाबीनचे ८ कोटी ८१ लाख ६१ हजार १६८ रुपये चुकारे अदा करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यातील १५ खरेदी केंद्रांवर १२ हजार १४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ३ हजार ५ शेतकऱ्यांचे ६ हजार ७०८ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. त्यापैकी १२ केंद्रांवरच्या १ हजार ३०१ शेतकऱ्यांना २७ हजार ५५ क्विंटल सोयाबीनचे १३ कोटी २३ लाख ४० हजार ७८१ रुपये चुकारे अदा करण्यात आले.

सोयाबीन चुकारे अदायगी स्थिती (सोयाबीन क्विंटलमध्ये)

खरेदी केंद्र सोयाबीन शेतकरी संख्या रक्कम

परभणी ३६७ ४८ १७ लाख ९५ हजार ३५४ रुपये

पेडगाव २५२१ १४८ १ कोटी २३ लाख ३५ हजार १७८ रुपये

जिंतूर २४४ २८ ११ लाख ९६ हजार ९४ रुपये

बोरी १३०१ ८५ ६३ लाख ६६ हजार ९३८रुपये

सेलू ६५१६ ४१२ ३ कोटी १८ लाख ७८हजार ७१८ रुपये

मानवत ६६३ ५५ ३२ लाख ४३ हजार ३९६ रुपये

पाथरी १०९० ७० ५३ लाख ३२ हजार २८० रुपये

सोनपेठ २४२९ १ कोटी १८ लाख ८५ हजार ११४ रुपये

पूर्णा २८८८ १६० १ कोटी ४१ लाख २८ हजार ९६ रुपये

हिंगोली १२०८ ८० ५९ लाख ११ हजार ९८२ रुपये

कनेरगाव ५५७४ १९८ २ कोटी ७२ लाख ६८ हजार ८ रुपये

फाळेगाव १८०२ ७४ ८८ लाख १५ हजार ३८४ रुपये

कळमनुरी २६९९ १४२ १ कोटी ३२ लाख ३ हजार ५०८ रुपये

वारंगा २७४० १५१ १ कोटी ३४ लाख ६ हजार ५२६ रुपये

वसमत १७०६ ८९ ८३ लाख ४८ हजार १४९ रुपये

जवळा बाजार २८९५ ११० १ कोटी ४१ लाख ६२ हजार ३४० रुपये

येळेगाव २४२५ ११२ १ कोटी १८ लाख ६५हजार ५४६ रुपये

सेनगाव १८७३ १११ ९१ लाख ६५ हजार १६२ रुपये

नागासिनगी १५९५ ८८ ७८ लाख २ हजार ७४० रुपये

आडगाव १६७७ ९८ ८२ लाख ६ हजार ३३० रुपये

पुसेगाव ८५५ ४८ ४१ ला ८५ हजार १०६ रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT