Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : कापसाने केला यंदा अपेक्षाभंग; कमी दर, नुकसानीचा फटका

Cotton Rate : खानदेशात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पण गुलाबी बोंड अळी व इतर कारणांमुळे कापसाचे उत्पादन कमी आहे. त्यात आणखी कमी दर कापसाला आहे

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Dhule News : धुळे ः खानदेशात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. पण गुलाबी बोंड अळी व इतर कारणांमुळे कापसाचे उत्पादन कमी आहे. त्यात आणखी कमी दर कापसाला आहे. वित्तीय फटका कापूस विक्रीसंबंधी बसत असून, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याची स्थिती आहे.

अतिपावसाने यंदा खरीप हंगाम हवा तसा आला नाही. केवळ ४० ते ५० टक्के उत्पादन आले. कडधान्याचे पीक हवे तसे आलेच नाही. कापसाचे उत्पादन घटले आहे. ओल्या दुष्काळाची स्थिती तयार झाली. ओल्या दुष्काळी स्थितीमुळे उत्पादन कमी आले, पण कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे.

खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी यंदा ओलांडली आहे. काही तालुक्यांत पाऊस अधिक होता. तर काही भागात पाऊसमान हवे तसे होते. पूर्वहंगामी कापसाचे उत्पादन एकरी दोन, तीन ते चार क्विंटल एवढे हाती आले आहे.

कोरडवाहू कापसाचे उत्पादन एक क्विंटलपेक्षा कमी आहे. संक्रांतीनंतर दरात सुधारणा होते, असे शेतकरी मानतात. परंतु यंदा दर कमीच होत आहेत. यामुळे दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना नाही. डिसेंबर महिना अर्धा संपला तरी कापसाचे दर सुधारलेले नाहीत. प्रतिक्विंटल ५२००, ६२००, ६५५० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत किंवा थेट खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकरी अडचणीत आहेत. यामुळे मिळेल त्या दरात कापसाची विक्री सुरू आहे.

तीन वर्षांपूर्वी कापसाला दर ८५०० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटल असा होता. यंदा कमी लागवड व ओल्या दुष्काळामुळे उत्पादन कमी होईल व दर वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र दरवाढ यंदा झालेलीच नाही. सुरुवातीलाही कापसाचे दर यंदा ५००० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल असे होते.

त्यात मागील महिन्यात दरात सतत घसरण झाली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान यात वाढले आहे. दुसरीकडे शासकीय कापूस खरेदी अधिक गतीने किंवा हवी तशी सुरू नाही. शेतकऱ्यांचा शासकीय कापूस खरेदीस प्रतिसाद मिळत नाही, असे शासन सांगते. परंतु दुसरीकडे खरेदी केंद्रांची मागणी दुर्लक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT