Tendu Agrowon
ॲग्रो विशेष

Tendu : तेंदू मजुरांची २० कोटी रुपयांची मजुरी थकित

Tendu Collection : अहेरी उपविभागातील अहेरी, मुलचेर, सिरोंचा, भामरागड या भागातील आदिवासींना तेंदूपत्ता संकलनातून रोजगार मिळतो.

Team Agrowon

Gadchiroli News : अहेरी उपविभागातील अहेरी, मुलचेर, सिरोंचा, भामरागड या भागातील आदिवासींना तेंदूपत्ता संकलनातून रोजगार मिळतो. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून तेंदूपत्ता मजुरी थकित असल्याने या मजुरांची आर्थिक कोंडी झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे.

मंगळवारी (ता.२३) त्यांनी या विषयावर पत्रकार परिषदेत घेत थकीत २० कोटी रुपयांची मजुरी देण्याची मागणी केली. ताटीकोंडावार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून मजुरांना थकित रक्‍कम मिळाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

आता पुन्हा तेंदूपत्ता तोंडण्याचा संधी हंगामाच्या माध्यमातून आली आहे. मात्र तेंदूपत्ता मजुरांना थकित रक्‍कम मिळाली नसल्याने त्यांच्यामध्ये हे काम करण्याविषयी नाराजी दिसून येत आहे.

त्यामुळे शासन, प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेत मजुरांच्या थकीत मजुरीचा प्रश्‍न सोडवावा. तेंदूपत्ता मजुरीची रक्‍कम ज्या कंत्राटदारांनी थकीत ठेवली आहे. त्यांची प्रशासनाने चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे.

त्यांना काळ्या यादीत टाकून महाराष्ट्रात अथवा देशाच्या इतरही भागात त्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागास बंदी घालावी, अशी मागणीही ताटीकोंडावार यांनी केली आहे.

मजुरांची अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारांची व त्यांच्या मालमत्तांची सीबीआय तसेच ईडीमार्फत चौकशी व्हावी असेही ते म्हणाले. तेंदूपत्ता मजुरांची २० कोटी रुपयांची मजुरी थकीत असल्याचे त्यांनी सांगितले. या सोबतच अहेरी उपविभागातील

अनेक रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या भागात शिक्षण, आरोग्य सुविधांची देखील वानवा आहे. त्यामुळे या भागात मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT