Hirda Agrowon
ॲग्रो विशेष

Hirda Processing : हिरडा प्रक्रिया उद्योगाला २ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य

Processing Industry : जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांतील आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या संस्थेच्या प्रकल्पास चालना मिळावी, यासाठी अर्थसाहाय्य मंजूर झाले.

Team Agrowon

Pune News : वनोपजावर आधारित हिरडा प्रक्रिया उद्योगातून आदिवासी तरुणांना उद्योजक करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील श्री. कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या पुढील प्रकल्पासाठी एकूण १२ कोटी ५० लाख रुपये अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (ता. ७) झालेल्या बैठकीत झाला, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

संस्थेला यापूर्वी एक कोटी रुपये अनुदान दिले होते. या बैठकीत विशेष अनुदान म्हणून चार कोटी रुपये आणि आदिवासी विकास महामंडळ आणि शबरी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून ७ कोटी ७५ लाख देण्यात येणार आहे.

यापैकी तातडीने दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्यांतील आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या संस्थेच्या प्रकल्पास चालना मिळावी, यासाठी अर्थसाहाय्य मंजूर झाले.

या संस्थेच्या माध्यमातून हिरडा वनोत्पादनावर प्रक्रिया करून औषध तयार करण्यात येणार आहे. कृषी प्रक्रिया उद्योगामुळे तालुक्याच्या विकासास हातभार लागणार आहे.

याचबरोबर आदिवासी बांधवांना उद्योजकतेकडे घेऊन जाणाऱ्या व त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करणाऱ्या सहकारी संस्थेस प्रोत्साहन मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे आमदार बेनके यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

Onion Price Crash: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश

SCROLL FOR NEXT