Farmer Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Issue : नऊ महिन्यांत १९३३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

Agricultural Issue : विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना हमीभाव, कर्जमाफी आणि अन्य आश्‍वासनांचा सर्वच पक्षांकडून भडिमार केला जात असला, तरी मागील वर्षभरातील नऊ महिन्यांत तब्बल १९३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना हमीभाव, कर्जमाफी आणि अन्य आश्‍वासनांचा सर्वच पक्षांकडून भडिमार केला जात असला, तरी मागील वर्षभरातील नऊ महिन्यांत तब्बल १९३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्‍नांना हात घालण्याऐवजी, त्या सोडविण्याचा विश्‍वास देण्याऐवजी टाळ्याखाऊ भाषणे करण्यात धन्यता मानली जात आहे.

एक रुपयात पीकविमा, अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत आणि अन्य बाबी अधोरेखित करून सरकार शेतकऱ्यांसाठी बरेच काही करत असल्याचे सांगत असले, तरी जमिनीवरील वास्तव मात्र वेगळे आहे. बोगस बियाणे, खते, कीटकनाशके, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची कमतरता, कमी उत्पन्न आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.

जानेवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ च्या शेतकरी आत्महत्यांच्या आकड्यांवर नजर टाकली, तर जानेवारी ते मार्च आणि मे ते ऑगस्टदरम्यान सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना राबविली जाते. या योजनेचा दुसरा टप्पाही आता राबविला जाणार आहे.

मात्र ही योजना राबवून शेतकरी आत्महत्यांत किती घट झाली याची आकडेवारी राज्य सरकार दाखवत नाही. यंदा राज्यात सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात, तर त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर विभागात झाल्या असून नागपूर, नाशिक विभागांतील आकडेवारी चिंताजनक आहे.

अमरावती विभागात नऊ महिन्यांत तब्बल ७९४ , छत्रपती संभाजीनगर विभागात ६८८, तर नागपूर विभागात २२१ आणि नाशिकमध्ये १९७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. पुणे विभागातील सोलापूरमध्ये २४, सांगलीत ७, तर कोल्हापुरात दोन आत्महत्या झाल्या आहेत.

जानेवारी ते सप्टेंबर महिन्यांपर्यंतच्या शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता जानेवारीत २८८, फेब्रुवारीत २१४, मार्चमध्ये २१९, जूनमध्ये २०९ आणि ऑगस्टमध्ये २५० तर सप्टेंबरमध्ये २२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा आकड्यांचा आलेख वाढतच चालला आहे. सर्वच विभागांमध्ये वरील महिन्यांत आत्महत्यांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.

अमरावती विभागात यवतमाळ जिल्ह्यात २३७ , अमरावतीमध्ये १९२, अकोल्यात ११८, बुलडाण्यात १७७, वाशीममध्ये ६० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. तर, छत्रपती संभाजीनगर विभागात बीडमध्ये सर्वाधिक १४२, नांदेडमध्ये ११९, धाराशीवमध्ये ११५, लातूरमध्ये ६०, जालन्यात ६५, परभणीत ५०, हिंगोलीत २३ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे. नाशिक विभागातील जळगावमध्ये सर्वाधिक १२४, धुळ्यात ३२, अहिल्यानगरमध्ये ३३, नाशिकमध्ये सहा, नंदूरबारमध्ये २ आत्महत्या झाल्या आहेत. नागपूर विभागात वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ९०, गडचिरोलीत ८९, चंद्रपूरमध्ये ८२, नागपूरमध्ये २६, भंडाऱ्यात १९, गोंदियात ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

सध्या ‘एक रुपयांत पीकविमा’ देण्यात येतो. मात्र यंदा अतिवृष्टी आणि अन्य कारणांनी पिके वाया गेली आहेत. पीकविम्याचा एकूण आकडा मोठा दिसत असला तरी प्रति शेतकरी मिळणारा विमा अत्यल्प असतो. तसेच अतिवृष्टीच्या नुकसानीच्या मदतीची आकडेवारी फेकली जात असली तरी प्रत्यक्षात मिळणारी रक्कम ही तोकडी असल्याने शेतकऱ्यांना साधा उत्पादन खर्च मिळत नसल्याचेही समोर येत आहे.

पहिल्या पिकाने केले निराश

खरीप हंगामात हातात येणारे पहिले पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. दसरा, दिवाळीसारख्या सणात शेतकऱ्यांच्या हातात रोकड देणारे हे पीक दरवर्षी शेतकऱ्याला निराश करत आहे. यंदा अतिवृष्टीतून वाचवून घरी आणलेल्या सोयाबीनला ३१५० रुपयांपासून ते ४३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यामुळे बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च वजा जाता फारसे हातात पडत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

विभागनिहाय शेतकरी आत्महत्यांचे आकडे

कोकण : ०

पुणे : ३३

नाशिक : १९७

छत्रपती संभाजीनगर : ६८८

अमरावती : ७९४

नागपूर : २२१

एकूण : १९३३

आत्महत्या नोंदीत भ्रष्टाचार

शेतकरी आत्महत्यांचा वाढता आकडा राज्यासमोर चिंता निर्माण करणार असला तरी यात मोठा भ्रष्टाचार प्रशासकीय यंत्रणा करत असल्याचे बोलले जात आहे. अनेकदा अतिमद्यपान आणि अन्य कारणांनी आत्महत्या होतात. या आत्महत्या शेतकरी आत्महत्या म्हणून दाखवल्या जात असल्याचा दावा वरिष्ठ अधिकारी करत आहेत. मात्र, वर्षानुवर्षांची नापिकी आणि अन्य कारणांनी व्यसनाधीनता आणि कर्जबाजारीपणा हे आत्महत्यांमागील प्रमुख कारण असल्याचेही प्रशासकीय अधिकारी मान्य करतात.

प्रमुख कारणे

बाजारभावातील चढ-उतार

बोगस खते, बियाणे, कीटकनाशके

उत्पादन खर्चात वाढ

मजुरी वाढ, मजुरांची कमतरता

वाढती महागाई

कोरडवाहू शेती हाच पर्याय

पिकविण्यापलीकडे कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नसणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Development Project : सहवीजनिर्मिती प्रकल्प फायदेशीर

Supreme Court Order : शरद पवार यांचे फोटो, व्हिडिओ वापरू नका

Rabi Sowing : रब्बीच्या २९ टक्के पेरण्या

Bird Species : वायंगणीत पक्ष्यांच्या नव्वद प्रजाती आढळल्या

Silk Industry Loan : रेशीम उद्योगासाठी कर्ज मिळणार

SCROLL FOR NEXT