MPKV Rahuri Agrowon
ॲग्रो विशेष

MPKV Rahuri : ‘एमपीकेव्ही’चे १९ विद्यार्थी प्रशिक्षणासाठी बॅंकॉकला रवाना

Modern Agriculture News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत ‘कास्ट’ प्रकल्पांतर्गत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कृषी महाविद्यालयातील १९ विद्यार्थी बॅंकॉक येथील ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे रवाना झाले आहेत.

Sandeep Navle

Pune News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत ‘कास्ट’ प्रकल्पांतर्गत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कृषी महाविद्यालयातील १९ विद्यार्थी बॅंकॉक येथील ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे रवाना झाले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षणामध्ये धुळे कृषी महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी, पुणे कृषी महाविद्यालयाचे आठ, कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे दोन तर राहुरीतील पदव्युत्तर महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी एक महिन्याचा आहे.

हे प्रशिक्षण १६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२३ या दरम्यान होईल. प्रशिक्षण काटेकोर शेतीसाठी ‘गुगल अर्थ इंजिन, आयओटी आणि ड्रोन तंत्रज्ञान’ या विषयावर आधारित असेल. या प्रशिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण होईल.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील म्हणाले, ‘‘जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान तंत्रज्ञान केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरु करण्यात आले आहे.

या प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनासाठी प्राध्यापक तसेच पदव्युत्तर व पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन विषयी कार्यक्षमतेचे बळकटीकरण करण्यात येईल. त्यासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्याने आदींचे आयोजन करण्यात येते.

तसेच ड्रोन, रोबोट, आयओटी, कृत्रिम बुद्धिमत्ता, भौगोलिक प्रणाली, रिमोट सेंन्सिंग, अर्थ इंजिन आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनावरील संशोधनासाठी केला जात आहे. या प्रसंगी कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर उपस्थित होते. डॉ. प्रवीण खराडे यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT