Buldana News : विधानसभा निवडणुकीसाठी दाखल अर्जांची छाननी झाली असून सातही विधानसभा मतदार संघांमध्ये १९९ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यानुसार १८७ अर्ज पात्र तर १२ नामनिर्देशन पत्र अपात्र ठरविण्यात आले आहेत. आता ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी मागे घेण्यास मुदत देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघांत छाननी करण्यात आली. त्यात मलकापूरमध्ये २२, बुलडाणा २१, चिखली ४२, सिंदखेड राजा ३५, मेहकर ३०, खामगाव येथे २२ व जळगाव जामोद येथे १५ अशी एकूण १८७ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे पात्र ठरली.
तर मलकापूर व चिखली येथे प्रत्येकी एक, सिंदखेडराजा येथे दोन, खामगाव व जळगाव जामोद येथे प्रत्येकी चार नामनिर्देशन अर्ज असे एकूण १२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले.
अपात्र ठरलेल्या उमेदवारांचा विचार केल्यास मलकापुरात संगीता नौकरीया (अपक्ष), चिखली मतदार संघात सुकेशनी शालीकराम गवई, सिंदखेडराजामध्ये प्रशांत दिलीप पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), सिद्धार्थ आबाराव सिनगारे (बहुजन समाज पक्ष), खामगाव मतदार संघातील गौरव तुलशीराम सपकाळ (अपक्ष),
अलका दिलीपकुमार सनंदा (काँग्रेस), ॲड. दशरत भिकाजी वानखेडे (बहुजन समाज पक्ष) व मो. बिलाल सत्तार (इंडियन युनियन मुस्लीम लीग), जळगाव जामोद मतदार संघात अपर्णा संजय कुटे, विनोद सुखदेव इंगळे (बहुजन समाज पक्ष), प्रफुल्ल अरुण तायडे(रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) व ज्ञानेश्वर समाधान मारोडे (अपक्ष) यांचे अर्ज बाद झाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.