Jalyukt Shiwar Abhiyan Agrowon
ॲग्रो विशेष

Jalyukt Shiwar 2.0 : जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत १८१ कामे पूर्ण

Water Conservation Scheme : जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ९१ गावांची निवड करण्यात आली आहे. प्रारूप आराखड्यात विविध यंत्रणांची ८७५ आणि अभिसरण कामे मिळून एकूण २ हजार ३३७ कामांचा समावेश आहे.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत नोव्हेंबर अखेरपर्यंत जलसंधारणाची १८१ कामे पूर्ण झाली असून, त्यावर ५ कोटी ४५ लाख ९२ हजार रुपये खर्च झाला आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत परभणी जिल्ह्यातील ९१ गावांची निवड करण्यात आली आहे. प्रारूप आराखड्यात विविध यंत्रणांची ८७५ आणि अभिसरण कामे मिळून एकूण २ हजार ३३७ कामांचा समावेश आहे.

त्यासाठी अंदाजित ७६ कोटी ६८ लाख ६२ हजार रुपये निधी आवश्यक आहे. जिल्ह्याच्या प्रारूप आराखड्यात यंत्रणानिहाय कामांमध्ये कृषी विभाग ३९० कामे, जिल्हा परिषदेचा लघू पाटबंधारे विभाग २३ कामे, जलसंधारण विभाग २८० कामे, वनविभागाची ११६ कामे, भूजल सर्वेक्षण विभागाची ६६ कामे आहेत.

तांत्रिक मान्यता दिलेली एकूण ३७४ आणि प्रशासकीय मान्यता दिलेली ३२० कामे आहेत. त्यासाठी २९ कोटी ६९ लाख रुपये निधी अपेक्षित आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या मध्ये कृषी विभाग अंतर्गत ४१ कामांसाठी १ कोटी ४९ लाख ९३ हजार रुपये निधी आवश्यक आहे.

जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभाग अंतर्गत ९ कामांसाठी २० लाख ३१ हजार रुपये, जलसंधारण विभाग अंतर्गत १८३ कामांसाठी २५ कोटी ४६ लाख ३० हजार रुपये निधी आवश्यक आहे. भूजल सर्वेक्षण विभाग अंतर्गत ६६ कामांसाठी ४२ लाख ९० हजार रुपये, तर वनविभाग अंतर्गत २१ कामांसाठी २ कोटी ९ लाख ३४ हजार रुपये निधीची गरज आहे.

नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागअंतर्गंतची ९ कामे पूर्ण झाली असून, त्यावर ११ लाख ८७ हजार रुपये, जलसंधारण विभागाच्या १०६ कामांवर ५ कोटी ९ लाख ७८ हजार रुपये तर भूजल सर्वेक्षण विभागाच्या ६६ कामांवर २४ लाख २७ हजार रुपये निधी मिळून एकूण ५ कोटी ४५ लाख ९२ हजार रुपये निधी खर्च झाला असल्याची माहिती मृद्‍ व जलसंधारण विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

Subsidized Electricity Scheme: कृषिपूरक व्यवसायांना लवकरच सवलतीच्या दराने वीज

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

SCROLL FOR NEXT