Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : दूध अनुदानाचे आतापर्यंत १७६ कोटींवर वितरण

Milk Rate : दूध व्यवसाय अडचणीत आल्यामुळे अनुदानाची रक्कम मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.

डी. के. वळसे पाटील

Pune News : दुधाला कमी दर मिळत असल्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रति लिटर पाच रुपये अनुदानाचे आतापर्यंत १७६ कोटी ९२ लाख रुपये राज्यातील दोन लाख ७२ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे दुग्ध व्यवसाय विकासाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दिली.

पहिले एक महिन्याकरिता असणारे अनुदान नंतर दोन महिन्याकरिता करण्यात आले. तूर्त, ११ जानेवारी २०२४ ते १० मार्च २०२४ या दोन महिन्याकरिता हे अनुदान राज्य सरकार शेतकऱ्यांना देणार आहे.

आयुक्त श्री. मोहोड म्हणाले, ‘‘दूध व्यवसाय अडचणीत आल्यामुळे अनुदानाची रक्कम मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासन निर्णयानुसार ५ जानेवारी २०२४ रोजी राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजना जाहीर केली. सदर योजनेची अंमलबजावणी राज्यात सुरू आहे.

राज्यातील सहकारी व खासगी अशा एकूण २७९ दूध प्रकल्पांनी अनुदानाची रक्कम मागणी केली होती. पण प्रत्यक्षात २३५ दूध प्रकल्पांनी ऑनलाइन पद्धतीने परिपूर्ण नोंदणी केल्यामुळे सदर दूध प्रकल्प अंतर्गत दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक शेतकरी पात्र ठरले आहेत.’’

श्री. मोहोड म्हणाले, ‘‘प्रत्येक शेतकऱ्याकडे असणाऱ्या गाईंना टॅगिंग करण्यात आले होते. त्यानुसार दहा लाख १८ हजार ८५६ गाईंची संख्या असून, सदर गाईंनी पस्तीस कोटी ३८ लाख ४९ हजार ६१८ लिटर दूध पुरवठा केला आहे. अनुदान वेळेत उपलब्ध व्हावे म्हणून पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व सहकार या विभागामार्फत संयुक्तरीत्या सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.

योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्राप्त अर्जाची छाननी करून जिल्हा नियोजन सहकारी व खासगी प्रकल्पांना माहिती भरण्याकरता लॉगिन आयडी व युजर आयडी उपलब्ध करून देण्यात आले होते. पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे.’’

खासगी व सहकारी दूध प्रकल्प : २३५

- पात्र दूध उत्पादक शेतकरी : दोन लाख ७२ हजार २९९.

- टॅगिंग गाईंची संख्या : दहा लाख १८ हजार ८५६.

- दूधपुरवठा : ३५ कोटी ३८ लाख ४९ हजार ६१८ लिटर.

- अनुदान रक्कम : १७६ कोटी ९२ लाख ४९ हजार रुपये.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT