Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात १.५८ टक्के रब्बी पीककर्ज वितरीत

Rabi Season 2024 : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात ५१८ कोटी १९ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून सोमवार (ता. १८) पर्यंत विविध बँकाचे मिळून ६५२ शेतकऱ्यांना ८ कोटी १८ लाख रुपये (१.५८ टक्के) वाटप झाले होते.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात ५१८ कोटी १९ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून सोमवार (ता. १८) पर्यंत विविध बँकाचे मिळून ६५२ शेतकऱ्यांना ८ कोटी १८ लाख रुपये (१.५८ टक्के) वाटप झाले होते.

यंदाच्या रब्बी हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ११४ कोटी ८१ लाख रुपये, व्यापारी बँकांना २९४ कोटी १५ लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १०९ कोटी २३ लाख रुपये एवढे उद्दिष्ट आहे. सर्वच बँकांची कर्ज वाटपाची गती अतिशय संथ आहे.

सोमवार (ता. १८) पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवाटप सुरु केलेले नव्हते. व्यापारी बँकांनी १०८ शेतकऱ्यांना ३ कोटी ६१ लाख ६९ हजार रुपये (१.२३ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने ५४४ शेतकऱ्यांना ४ कोटी ५७ लाख रुपये (४.१८ टक्के) असे सर्व बँकांचे मिळून एकूण ८ कोटी १८ लाख रुपये पीककर्ज वाटप झाले आहे.

गतवर्षी (२०२३) याच तारखेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ लाख ३५ हजार रुपये, व्यापारी बँकांनी ५९ कोटी २६ लाख ३९ हजार रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २ कोटी ९० लाख रुपये असे एकूण ६२ कोटी ३१ लाख ७४ हजार रुपये (१२.२१ टक्के) पीककर्ज वाटप केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT