Sugarcane Variety agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Variety : 15012 या उसाच्या वाणाला तुरा आणि पांगशा फुटल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Sugarcane Variety 15012 : शेतकऱ्यांनी १५०१२ नवीन बियाण्याचा वापर, बियाणेनिर्मितीसाठी केला. पंरतु या बियाण्याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.

sandeep Shirguppe

15012 Variety of Sugarcane : महाराष्ट्रातील पाडेगाव संशोधन केंद्राच्यावतीने कृषी विद्यापीठामार्फत पीडीएन १५०१२ ही नवीन उसाची जात मागीलवर्षीपासून सुरू करण्यात आली आहे. या उसाची जात चांगली असल्याचे संशोधनातून निष्पण्ण झाल्याने गतवर्षी अनेक शेतकऱ्यांनी या नवीन बियाण्याचा वापर, बियाणेनिर्मितीसाठी केला. पंरतु या बियाण्याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेश्वर (ता. करवीर) येथे उसाच्या नवीन १५०१२ या बियाण्याला तुरा आणि पांगशा फुटला आहे. यामुळे उसाच्या नवीन बियाण्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कृषी विद्यापीठाने मात्र वातावरणातील बदलामुळे तुरा येऊन नत्राचे प्रमाण जास्त झाल्याचा दावा केला आहे.

सध्या ८६०३२ आणि २६५ या दोन वाणांसोबत शेतकऱ्यांना नवीन काहीतरी देण्याच्या उद्देशाने सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीने ऊस यावा यासाठी पाडेगाव संशोधन केंद्राने हे बियाणे विकसित केले आहे. यामुळे गत हंगामात आणि यावर्षी हंगामात शेकडो शेतकऱ्यांनी १५०१२ या बियाण्याचे बियाणे तयार करण्यासाठी वापर केला.

मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेश्वर (ता. करवीर) येथे पांडुरंग दिंडे या शेतकऱ्याने चार गुंठ्यांत बियाणे तयार करण्यासाठी १५०१२ या वाणाचा प्लॉट केला आहे. चांगल्या पद्धतीने उसाची वाढ झाली, मात्र वर्ष पूर्ण होण्याआधी आणि बियाण्यांसाठी ऊस तोडण्याच्या आधी बहुतांश उसाला तुरा आला आहे. अनेक उसाला पांगशा फुटला आहे.

कुडित्रेत अरविंद नामदेव शेलार यांनी पाच गुंठ्यांत या बियाण्यांचा प्लॉट केला आहे. या उसाच्या बियाण्याला तुरा आला आहे, मात्र त्यांनी हे बियाणे वाढविणार असल्याचे सांगितले. यावेळी शेतकरी रघुनाथ बचाटे, बाबसो पाटील घटनास्थळी उपस्थित होते. उसाच्या नवीन १५०१२ बियाणाला तुरा आला आणि पांगशा फुटल्या ही व्हरायटी लवकर पक्व होणार असल्याचे शेतकऱ्यांमध्ये याबाबत चर्चा होती. यामुळे आडसाली आणि पूर्वहंगामीसाठी वापरावी का नको, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याचबरोबर कृषी तज्ञ विद्यासागर गेडाम म्हणाले की, वातावरणातील बदलामुळे तुरा आला आहे. नत्राची मात्रा जास्त दिल्यामुळे पांगशा फुटला आहे. खताचा शेवटचा डोस जास्त प्रमाणात पडला असेल. पुढे दीड महिन्यापर्यंत वजनात घट येणार नाही.

वजन चांगले, उत्पादन कमी

बियाण्यांत २६५ ऊस व ८६०३२ या उसाच्या जातीचा क्रॉस, एकत्र केला आहे. २६५ या जातीचे उसाचे बियाणे चांगल्या पद्धतीने येते, मात्र या उसाला वजन चांगले येते; मात्र साखर कमी पडते, अशी कारखानदारांची तक्रार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT