watershed development work  Agrowon
ॲग्रो विशेष

Watershed Development : पाणलोट विकास योजनेसाठी १४३ कोटींचा निधी

Agriculture Scheme : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक २.० ही योजना मृद्‍ व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

Team Agrowon

Yavatmal News : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट विकास घटक २.० ही योजना मृद्‍ व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र स्वयंसाह्यता गटांना वितरणासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे १४३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती मृद्‍ व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.

मंत्री राठोड म्हणाले, की राज्यात केंद्र पुरस्कृत पंतप्रधान कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक २.० ही योजना मृद्‍ व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचे निधी प्रमाण केंद्र राज्य शासन अनुक्रमे ६० - ४० टक्के असे असून, योजनेचे प्रकल्प मूल्य १३३५.५६ कोटी इतके आहे.

हा प्रकल्प राज्यातील ३० जिल्ह्यांतील १०२ तालुक्यांतील १६०३ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील एकूण ५,६५,१८६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेअंतर्गत उपजीविका घटकांतर्गत प्रकल्प मूल्याच्या १५ टक्के निधीची तरतूद असून, उपजीविका हा घटक ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या यंत्रणेमार्फत त्यांच्या आर्थिक निकषानुसार राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी मृद्‍ व जलसंधारण विभागाकडून पात्र स्वयंसाह्यता गटांना निधी वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे १४३ कोटी निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.

निधी मिळण्यास पात्र स्वयंसाह्यता गटांना ३० हजार व प्रभाग संघामार्फत समुदाय गुंतवणूक निधी मिळण्यास पात्र स्वयंसाह्यता गटांना ६० हजार याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. प्रभाग संघ व स्वयंसाह्यता गटांना निधी वितरित करण्यात येणार असून, पात्र स्वयंसाह्यता गट व प्रभाग संघ यांना निधी पाणलोट समितीच्या शिफारशीने वितरित करण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agripreneurship MOU: कृषी विद्यापीठ, सह्याद्री फार्म्समध्ये करार

Jalalakshmi Irrigation Scheme: जललक्ष्मी प्रवाही योजनेचा २३ गावांतील शेतीला लाभ

Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश

Solapur Development Projects: वारी, कॉरिडॉर, आयटी पार्कला ‘टॉप प्रायोरिटी’

Sugarcane Payments Pending: उसाचे पेमेंट न मिळाल्याने शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT