Farmer Accident Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Accidents Insurance : अमरावती जिल्ह्यातील १२७ शेतकऱ्यांचा अपघातांत मृत्यू

Agriculture Scheme : गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या अपघातात जिल्ह्यातील १२७ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन शेतकऱ्यांना अपंगत्व आले आहे.

Team Agrowon

Amaravati News : गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या अपघातात जिल्ह्यातील १२७ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन शेतकऱ्यांना अपंगत्व आले आहे. या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून अर्थसहाय देण्यात आले आहे. जवळपास १.७० कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून चार लाख रुपये शासनाकडून अप्राप्त आहेत.

शेतात काम करताना शेतकऱ्यांचा विद्युत धक्क्याने किंवा साप चावून अथवा वीज पडून मृत्यू होतो. काहींना कायमचे अपंगत्व येते. अशा कुटुंबांचा कर्ता आधारच गमावल्या जात असल्याने कुटुंब निराधार होते. या कुटुंबांना गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून आर्थिक सहकार्य केल्या जाते.

या योजनेत आता रस्ता अपघातात मृत्यू झाल्यास किंवा कायम अपंगत्व आल्यासही आर्थिक सहकार्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शेतकऱ्याच्या कुटुंबातील गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यासही मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

गेल्या वर्षभरात एक एप्रिल ते २८ फेब्रुवारी या कालावधीत विविध प्रकारच्या अपघातांत जिल्ह्यातील १२७ शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. दोन शेतकऱ्यांना अपंगत्व आले आहे. जिल्ह्यातून या योजनेसाठी चौदाही तालुक्यातून १५२ प्रस्ताव दाखल झाले होते. तालुकास्तरीय समितीने त्यामधील १२ प्रस्ताव नामंजूर केले होते, तर कागदपत्रांची पूर्तता न केल्याचे आठ प्रस्ताव होते.

त्यापैकी चार प्रस्ताव अपिलात आल्यानंतर एक प्रस्ताव मंजूर झाला. कृषी विभागाने २.५४ कोटी रुपये अनुदानाची मागणी नोंदविली होती. आयुक्तस्तरावरून ८२ लाख रुपये आधी प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाने पुन्हा १.७४ कोटी रुपयांची मागणी नोंदविली.

प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

अपघाती मृत्यू झाल्यानंतर बरेच शेतकरी कुटुंब कृषी विभागाकडे प्रस्तावच दाखल करीत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. आता ही योजना अधिक सुटसुटीत करण्यात आली असून तालुकास्तरावरच प्रस्ताव दाखल करण्याची व मंजुरीची सोय उपलब्ध आहे. शेतकरी कुटुंबांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Talathi Recruitment 2026: तलाठी भरतीत कोतवालांना प्राधान्य, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

Native Seed Conservation: देशी वाणांच्या थेट विक्रीतून उभारले अर्थकारण

El Nino Impact: जागतिक शेतीमाल बाजाराला दुहेरी झटका

Fertilizer Black Marketing : खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात १.६९ लाख धाडी; महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई, लोकसभेत सरकारची माहिती

Gen Z Student Protest: ‘जेन झी’ आंदोलनाच्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT