Chandwad APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Chandwad APMC : सभापती संजय जाधवांवर अविश्वास

APMC News : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय दगू जाधव यांच्याविरोधात अठरापैकी बारा संचालकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

Team Agrowon

Nashik News : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय दगू जाधव यांच्याविरोधात अठरापैकी बारा संचालकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. सत्ता स्थापन करताना ठरलेल्या समझोत्यानुसार त्यांनी राजीनामा न दिल्याने इतरांना संधीसाठी बारा संचालकांनी हे पाऊल उचलले आहे.

प्रस्तावात म्हटले आहे, की सभापती जाधव संचालकांना विश्वासात घेऊन काम करत नाहीत. बाजार समितीचे उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना करण्याकडे लक्ष देत नाहीत. समितीच्या सभेच्या विषयपत्रिकेनुसार सभा होतात, मात्र त्याप्रमाणे लिहिले जात नाही. बऱ्याच वेळा संचालकांनी समितीच्या हिताच्या नसलेल्या ठरावास विरोध करून तो सभावृत्तान्त नोंदविला जात नाही.

बाजार समितीच्या प्रशासनावर वेळीच देखरेख नसल्याने कामकाजात समन्वय नाही. समितीच्या दैनंदिन कामकाजात शेतकरी, व्यापारी यांचा समन्वय राखला जात नाही. त्यामुळे समितीच्या उत्पन्नवाढीवर परिणाम झाला आहे. बाजार समिती कार्यक्षेत्रात यापूर्वी वडाळीभोई, रायपूर, वडनेरभैरव उपबाजार सुरू केले होते.

त्याकडे जातीने लक्ष न देता हा बाजार आवार बंद स्थितीत आहे. संचालकांनी वेळोवेळी सूचना करूनही ते सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. या मुद्द्यांचा विचार करता सभापती संजय जाधव यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव संमत करण्यासाठी बाजार समितीची विशेष सभा बोलविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

जे ठरले, त्यालाच बगल

दोन वर्षांपूर्वी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने बहुमत मिळवून बाजार समितीत सत्ता स्थापन केली होती. पॅनलमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची मिळून सत्ता स्थापन केली होती.

सत्ता स्थापन करताना तिन्ही पक्षांना समान संधी देण्याचे ठरल्यानंतर सभापतिपदी काँग्रेसच्या संजय जाधव यांना, तर शिवसेनेच्या कारभारी आहेर यांना उपसभापतिपदाची संधी मिळाली होती. ठरल्याप्रमाणे दहा महिन्यांनंतर उपसभापती कारभारी आहेर यांनी राजीनामा दिला, मात्र सभापती संजय जाधव यांनी २४ महिन्यांचा कालावधी उलटूनही राजीनामा दिला नाही, त्यामुळे बारा संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

प्रस्ताव दाखल करणारे सदस्य

माजी आमदार तथा संचालक शिरीषकुमार कोतवाल, बाजार समितीच्या उपसभापती डॉ. वैशाली जाधव, डॉ. सयाजीराव गायकवाड, योगेश ढोमसे, नितीन आहेर, कारभारी आहेर, डॉ. राजेंद्र दवंडे, पंढरीनाथ खताळ, मीना शिरसाठ, विक्रम मार्कड, सचिन अग्रवाल, रवींद्र पवार या संचालकांनी सभापती जाधव यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT