Katraj Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Katraj Doodh Sangh : ‘कात्रज’कडून दरफरक, बिलापोटी १२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Katraj Refund Maharashtra Farmers : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास गेल्या अर्थिक वर्षात ३ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास गेल्या अर्थिक वर्षात ३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्यानुसार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आलेल्या घोषणेनुसार दूध उत्पादकांना प्रतिलिटर १ रुपयाप्रमाणे दूध दरफरक देण्यात आला आहे.

या फरकापोटी संघाने ६ कोटी ४३ लाख रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. तसेच, या दहा दिवसांतील दूध बिलाची रक्कम ५ कोटी ८० लाख रुपयेही दूध उत्पादकांना अदा करण्यात आली आहे.

दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना १२ कोटी २३ लाख रुपयांची रक्कम जिल्हा दूध संघाकडून देण्यात आल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे, अशी माहिती दूध संघ प्रशासनाकडून देण्यात आली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांसमवेत संघातील सेवकांना ८.३३ टक्क्यांप्रमाणे १ कोटी ८२ लाख रुपयांच्या बोनसचेही वाटप करण्यात आला आहे. बाजारात कात्रजच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे संघाच्या नफ्यात वाढ होत आहे.

दीपावलीमध्ये आपल्या प्रियजनांना भेट देण्यासाठी संघातर्फे कात्रज मिठाई गिफ्ट पॅकची शृंखला बाजारात विक्रीसाठी ठेवली आहे. मिक्स मिठाईचे विविध बॉक्स बाजारात उपलब्ध करून देण्यात आले असून मागील वर्षी दिवाळीनिमित्त कात्रज मिक्स मिठाईची ३० टन विक्री झाली होती. यावर्षी अंदाजे ५० टनांपर्यंत विक्री होऊ शकते. या दृष्टीने संघाने नियोजन केले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

कात्रज डेअरी ही पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची सहकारी संस्था आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघ प्रगती करत आहे. कात्रजचे सर्व दूध व दुग्धजन्य पदार्थ हे १०० टक्के शुद्ध आहेत. संघाच्या नफ्यातील ७० टक्के नफा हा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी वापरला जातो. त्यामुळे ग्राहकांनी जास्तीत जास्त कात्रजच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांचा आस्वाद घ्यावा, जेणेकरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल.
- भगवान पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT