Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : लघू प्रकल्पांतील ११ टक्के पाणीसाठा घटला

गुरुवारी (ता. २३) जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील २२ पैकी राणीसावरगाव (ता. गंगाखेड) या १ लघू प्रकल्पात ७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

Team Agrowon

Parbhani Water News : गेल्या महिनाभरात परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांतील पाणीसाठ्यात ११ टक्के आणि मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्यामध्ये १५ टक्के घट झाली आहे.

बेसुमार पाणीउपसा सुरू आहे. त्यातच तापमानात वाढ झाली असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

गुरुवारी (ता. २३) जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ११.१७४ दलघमी (२६ टक्के) पाणीसाठा होता. केहाळ (ता. जिंतूर) येथील लघू तलावातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील २ मध्यम प्रकल्पांमध्ये ३७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

महिनाभरापूर्वी ता. २३ फेब्रुवारी रोजी लघू प्रकल्पांमध्ये सरासरी ३७ टक्के आणि मध्यम प्रकल्पांत सरासरी ६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

गुरुवारी (ता. २३) जलसंपदा विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील २२ पैकी राणीसावरगाव (ता. गंगाखेड) या १ लघू प्रकल्पात ७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

एकूण ८ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण १२ लघू तलावांमध्ये ० ते २५ टक्के पाणीसाठा आहे.

गुरुवारी (ता. २३) जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ४६ टक्के पाणीसाठा होता.

गतवर्षी (२०२१-२२) या कालावधीत २२ लघू तलावांमध्ये सरासरी १९.३४१ दलघमी (४६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. दोन मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी २४.११४ दलघमी (४६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change: हवामान बदलते, शेतीत बदल कधी?

Kharif Season Preparation: शेतकऱ्यांकडून रोपवाटिकेसाठी रान भाजणीची कामे अंतिम टप्प्यात

Sugar Factory Seizure: एफआरपी थकवणाऱ्या सात साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

Farm Loan Waiver: प्रलंबित कर्जमाफीला हिरवा कंदील; १४०० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT