Sugar Cane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : नांदेड विभागात १०८ कोटींची ‘एफआरपी’ अद्याप बाकी

कारखान्यांकडून आजपर्यंत एक हजार ६०६ कोटींची एफआरपी दिली आहे. यामुळे अद्याप शेतकऱ्यांची १०८ कोटींची बिले थकली आहेत.

Team Agrowon

Nanded News : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागातर्ंगत यंदा २९ कारखान्यांनी उसाचे गाळप (Sugarcane Crushing) केले आहे. ता. २८ फेब्रुवारी अखेर विभागात ८३ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले.

यापोटी शेतकऱ्यांना १७१४ कोटी रुपये देणे आपेक्षीत असताना कारखान्याकडून १६०६ कोटींची बिले अदा केली आहेत. अद्याप १०८ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगामाची सुरवात ता. २२ आक्टोबर रोजी लातूर जिल्ह्यातील सिद्धी शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज या खासगी साखर कारखान्याच्या गाळपाने झाली.

यंदा विभागातील २९ कारखाने सुरु झाले आहेत. यात परभणी जिल्ह्यात सात खासगी, हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी व तीन सहकारी, नांदेड जिल्ह्यात पाच खासगी व एक सहकारी तसेच लातूर जिल्ह्यातील पाच सहकारी व सहा खासगी अशा कारखान्यांचा समावेश आहे.

विभागाचा गाळप हंगाम सध्या आटोपतीकडे चालला आहे. २८ फेबु्रवारीपर्यंत ८३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक हजार ७१४ कोटींची एफआरपी देणे अपेक्षीत होते.

परंतु कारखान्यांकडून आजपर्यंत एक हजार ६०६ कोटींची एफआरपी दिली आहे. यामुळे अद्याप शेतकऱ्यांची १०८ कोटींची बिले थकली आहेत.

केन ऍक्टनुसार शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसात एफआरपी देणे बंधनकारक असते. परंतु याकडे कारखान्यांकडून दुर्लक्ष होत असल्याची माहिती मिळाली.

एफआरपी शिल्लक कारखाने

शेतकऱ्यांना एफआरपीनुसार उसाचे पैसे शिल्लक असलेल्या कारखान्यांत टोकाई सहकारी साखर कारखाना कुंरुदा, बळीराजा कानडखेड.

लक्ष्मीनृसिंह परभणी, पन्नगेश्‍वर पानगाव, जागृती शुगर तळेगाव, ट्वेटीवन शुगर साखखेडा कपीश्वर शुगर आदी कारखान्यांकडे एफआरपी थकली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT