Gosikhurd Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Water Tourism : गोसीखुर्द येथे जागतिक जल पर्यटनासाठी १०१ कोटी रुपये मंजूर

Gosikhurd Dam : गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र विकसित करून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्धतेसाठी व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य शासनाने १०१ कोटी ५५ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

Team Agrowon

Nagpur News : गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र विकसित करून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्धतेसाठी व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य शासनाने १०१ कोटी ५५ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

राज्यातील धरणक्षेत्र तसेच जलाशयामध्ये जल पर्यटन विकसित करून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत करणे आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे.

त्याअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरातही जागतिक दर्जाचे जल पर्यटन निर्माण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावासंदर्भात शिफारस करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीच्या बैठकीत गोसीखुर्द जलाशयाच्या परिसरात जागतिक दर्जाचे पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी १०१ कोटी ५५ लाखांच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

नुकताच या संदर्भात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने शासननिर्णय निर्गमित केला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार गोसीखुर्द जलाशय परिसरात सदर प्रकल्प सार्वजनिक आणि खासगी भागीदारीतून (पीपीपी) होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT