Solar Project Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Power Project : कृषी विद्यापीठात साकारणार १०० मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प

Mahatma Phule Agriculture University : महात्मा फुले कृषी विद्यापीठाबरोबर ‘महाजेनको’चा सौरऊर्जा प्रकल्पाबाबतचा सामंजस्य करार झाला आहे.

Team Agrowon

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठाबरोबर ‘महाजेनको’चा सौरऊर्जा प्रकल्पाबाबतचा सामंजस्य करार झाला आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहातील बैठकीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानुसार विद्यापाठीत ४०० एकर क्षेत्रावर हा प्रकल्प साकारेल.

त्यासाठी सुमारे ४७२ कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. ‘महानिर्मिती’द्वारे राहुरी कृषी विद्यापीठास वीजबिल कमी करण्यासाठी सौर संच उभारून देण्यात येणार आहेत.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाबरोबर महाजेनकोचा सौरऊर्जा प्रकल्प सामंजस्य करार झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या वेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, ‘महावितरण’चे अध्यक्ष लोकेश चंद्रा, ‘महानिर्मिती’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अन्बलगन, ‘महापारेषण’चे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार, महाऊर्जाच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के उपस्थित होते.

‘‘या सौरप्रकल्पामुळे २० व्यक्तींना कायमस्वरूपी, तर १०० व्यक्तींना हंगामी रोजगार उपलब्ध होईल,’’ अशी माहिती विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राचे प्रमुख पंडित खर्डे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Success Story: क्षारपड जमिनीला दिली नवसंजीवनी

Gram Sadak Yojana: रस्त्यांसाठी ६४२९ कोटी मंजूर

Agriculture Technology: कृषी समस्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञान स्पर्धा महत्त्वाच्या...

Crop Insurance 2025 : यंदाच्या खरिपातही कमी भरपाई मिळणाची शक्यता जास्त

Stone Picker Machine: ट्रॅक्टरचलित दगड वेचणी यंत्र

SCROLL FOR NEXT