Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : सोलापूर जिल्ह्यात १० लाख टन उसाचे गाळप पूर्ण

Sugarcane Crushing : यंदाच्या गाळप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील ३४ पैकी १७ साखर कारखाने एक डिसेंबरअखेर चालू झाले आहेत.

Team Agrowon

Solapur News : यंदाच्या गाळप हंगामात सोलापूर जिल्ह्यातील ३४ पैकी १७ साखर कारखाने एक डिसेंबरअखेर चालू झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत १० लाख ३५ हजार ३४० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ७.०९ टक्के सरासरी साखर उताऱ्याने सात लाख ३४ हजार ९० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

सोलापूर जिल्ह्यात पाच सहकारी व १२ खासगी कारखाने सुरू झाले आहेत. सहकारी कारखान्यात चार लाख ६१ हजार २८१ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, तीन लाख ६२ हजार ५०९ क्विंटल साखरनिर्मिती झाली आहे.

खासगी कारखान्यांनी पाच लाख ७४ हजार ५९ मेट्रिक टन उसाचे गाळप करत तीन लाख ७१ हजार ५९० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

जिल्ह्यातील सहकारी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.३३, तर खासगी कारखान्यांचा उतारा ६.४७ टक्के आहे. जिल्ह्यात सहकार महर्षी कारखाना गाळप व साखर उत्पादनात सध्यातरी आघाडीवर आहे. पांडुरंग कारखाना दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drinking Water Management: टंचाईग्रस्त भागातही पाणी पोहोचविणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Farmers Protest: पीकविम्यासाठी शेतकरी संघटनेचा चाबूक आपटत ‘ठिय्या’

Illegal Organic Fertilizer: वेंगुर्ल्यात विनापरवाना सेंद्रिय खतावर भरारी पथकाची कारवाई

Farm Loan Waiver: कर्जमुक्तीसाठी कोणते शेतकरी पात्र?; पुनर्गठित कर्जाबाबतही महत्त्वाचा निर्णय

Tembhu Irrigation Scheme: ‘टेंभूचे उन्हाळी आवर्तन बंद; ६० ठिकाणचे शेतकरी पाण्याविना

SCROLL FOR NEXT