Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill Waiver : तीस टक्के वीजबिल माफीसाठी १० दिवस शिल्लक

जमा झालेला निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे.

Team Agrowon

Nanded News : थकबाकीदार कृषिपंपधारक शेतकऱ्यांना विलंब आकार आणि व्याजातील सूट दिल्यानंतर सुधारित थकबाकीनुसार ३० टक्के माफीचा लाभ घेण्यासाठी आता मार्च २०२३ अखेर पर्यंतचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

शेतकऱ्यांनी कृषी वीज जोडणी धोरणाचा लाभ घेत थकीत बीलासह चालू वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

विलंब आकार आणि व्याजातील सूट दिल्यानंतर सुधारित थकबाकीनुसार ३० टक्के माफीचा लाभ घेण्यासाठी आता मार्च २०२३ अखेर पर्यंतचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

कृषीपंप वीज जोडणी धोरणाच्या माध्यमातून वीजबिलांच्या वसुलीतून प्राप्त झालेला ६६ टक्के आकस्मिक निधी हा प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जमा झालेला निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे.

मुदखेड उपविभागातर्गत येणाऱ्या इजळी गावातील शेतकरी दत्तराव नागोराव मुंगळ यांच्याकडे कृषिपंपाचे एक लाख ८० हजार रुपयांची थकबाकी होती.

महाकृषी ऊर्जा अभियानाच्या धोरणांतर्गत निर्लेखना नंतर विलंब आकार व व्याजाच्या तीस टक्के माफीच्या सवलतीच्या आधारे मिळालेल्या संधीचा लाभ घेत दत्तराव मुंगल यांनी ७१ हजार ६३० रूपयांची भरघोस सूट मिळवत एकरकमी एक लाख ८ हजार ३७० रुपयांचा वीज बिल भरणा केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT