Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : रत्नागिरीत ५४७ कर्जदारांचे १० कोटींचे कर्ज माफ

भूकंप होऊन महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर लगेच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले.

Team Agrowon

Ratnagiri News : जिल्ह्यातील भू-विकास बँकेच्या कर्जदारांना शासानाने मोठा दिलासा दिला आहे. बँकेच्या जिल्ह्यातील ५४७ कर्जदारांचे १० कोटी ५२ लाख ९१ हजार ७४१ रुपयांचे कर्ज माफ केले आहे.

कर्ज माफ झालेल्या या कर्जदारांच्या सात-बारावरील बोजा तत्काळ कमी करून सात-बारा कोरा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील या कर्जदारांचे सात-बारा मार्चअखेर कोरे होणार आहेत.

राज्यात मोठा राजकीय

भूकंप होऊन महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर लगेच शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भू-विकास बँकांच्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.

त्यानुसार सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शासन निर्णय काढून कर्ज माफीचे आदेश दिले होते; मात्र त्यानंतर शेतकऱ्यांच्या सात-बारावरील कर्जाचा बोजा कायम होता. त्यामुळे अन्य ठिकाणांहून कर्ज घेताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या.

शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित (भू-विकास बँक) बँकेच्या ५४७ वैयक्तिक शेतकरी कर्जदार आणि ५ सहकारी संस्थांचे एकूण कर्ज १० कोटी ५२ लाख ९१ हजार ७४१ रुपये होते. ते शासन निर्णयानुसार माफ झाले आहे.

या शेतकऱ्यांचे सात-बारावर नोंदलेले बँकेचे कर्जाचे बोजेदेखील कमी करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी ६ मार्च २०२३ आदेश काढून शेकऱ्यांचे सात-बारा कोरे करण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना दिल्या आहेत.

तरी सर्व संबंधित शेतकरी बांधवानी तालुका तहसीलदारत आणि सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था रत्नागिरी डॉ. सोपान शिंदे यांनी केले.

तालुकानिहाय शेतकरी संख्या

रत्नागिरी - ५३

राजापूर - १३१

मंडणगड- ६४

गुहागर - ६६

दापोली - ३२

देवरुख - २५

लांजा - ४७

चिपळूण - ५७

खेड - ७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT