Ratnagiri Alphonso MAngo Agrowon
बाजारभाव बातम्या

कर्नाटकी आंबा म्हणून रत्नागिरी हापूस जप्त

पुणे बाजार समितीकडून कोकणातील शेतकरी वेठीस

टीम ॲग्रोवन 

पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये (Pune APMC) कोकण हापूस (Kokan Alphonso) म्हणून कर्नाटकचा आंबा (Karnatak Mango) विक्री करीत शेतकरी आणि ग्राहकांच्या फसवणुकीचे वृत्त दै. ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या बाजार समिती कर्मचाऱ्यांनी कोकणातील शेतकऱ्यांचा हापूस आंबा कर्नाटक म्हणून जप्त केल्याची कामगिरी केली आहे. या प्रकारात शेतकऱ्याला वेठीस धरत नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. तर या प्रकारात शेतकऱ्याच्या दोन आंब्याच्या पेट्या चोरीस गेल्याचे समोर आले आहे.

पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २५) शेतकरी महादेव लक्ष्मण काळे (Laxman Kale Farmer) (रा. दापोली) यांनी त्यांच्या शेतातील हापूस आंब्याच्या शंभर पेट्या विक्रीसाठी आणल्या होत्या. परंतु हा आंबा कर्नाटक आंबा असल्याचे म्हणत बाजार समितीच्या गट प्रमुखाने शेतकऱ्यांच्या पेट्या ताब्यात घेतल्या. शेतकऱ्याने (Mango Farmer) सातत्याने विनवणी करूनही त्यास प्रतिसाद न देता उलट शेतकऱ्यालाच दमदाटी करत पेट्या सुरक्षारक्षकाच्या केबिनमध्ये आणण्यात आल्या. हा आंबा कर्नाटकचा आहे की रत्नागिरी हापूस, याची तपासणी करण्यासाठी गटप्रमुखाने परप्रांतीय विक्रेत्याला बोलावत, आम्हाला वेठीस धरल्याचे काळे यांनी सांगितले.

शेतकरी महादेव काळे म्हणाले, ‘‘दापोलीवरून येताना मी हापूसच्या शंभर पेट्या आणल्या होत्या. हा आंबा रत्नागिरीचा नसून कर्नाटकचा असल्याचे सांगत बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये दोन पेट्या चोरीला गेल्या आहेत. ९८ पेट्या शिल्लक आहेत. समितीचे लोक म्हणतात गाडी बाहेर लावायची. बाहेर गाडी लावली की बाहेरची लोक त्रास देतात. आत गाडी लावली की पार्किंगवाले त्रास देतात.’’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया शेतकऱ्याने दिली.

दापोली येथून खरेदीदाराने आंबा खरेदी करून आणला होता. खरेदीदार नवीन असला, तरी संबंधित अडते जुने आहेत. अडत्याने तो माल त्यांच्या गाळ्यावर उतरवणे आवश्यक होते. शेतकरी असो किंवा व्यापारी, बाजार समितीच्या अधिकारी कर्मचारी यांचे वागणे, बोलणे नम्रतेचे असावे या बाबत सूचना देण्यात येतील. घडलेल्या प्रकाराची माहिती घेऊन, पुढील कार्यवाही केली जाईल.
मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT