Pomegranate in Nashik Incoming improvements; Rate fixed 
बाजारभाव बातम्या

नाशिकमध्ये डाळिंबांच्या आवकेत सुधारणा; दर स्थिर

नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबांची आवक ७०१ क्विंटल झाली. आवक वाढली आहे. यासह दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले.

टीम अॅग्रोवन

नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात डाळिंबांची आवक ७०१ क्विंटल झाली. आवक वाढली आहे. यासह दर स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मृदुला वाणास १००० ते १२०००, तर सरासरी ९००० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

चालू सप्ताहामध्ये पोळ कांद्याची आवक वाढल्याचे  दिसून आले. आवक ८७६१ क्विंटल झाली. दरांत घसरण झाल्याचे दिसून आले. त्यास प्रतिक्विंटल १२५० ते २६५०, तर सरासरी दर २१०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ९४७१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७५० ते १३५०, तर सरासरी दर ११५० रुपये राहिला. लसणाची आवक ७९८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३१०० ते ८७५०, तर सरासरी दर ६५०० रुपये राहिला. आल्याची आवक ४४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २५००, तर सरासरी दर २००० रुपये राहिला.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी, तर काहींची आवक जास्त झाली. त्यात बाजारभाव सुद्धा कमी जास्त निघाले. घेवड्याची आवक ४०३६ क्विंटल झाली. आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव कमी झाले. वालपापडीला प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० असा, तर सरासरी दर ३००० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २४०० ते ४१००, तर सरासरी दर ३३०० रुपये राहिला. 

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला १०० ते २२५, तर सरासरी १५०, वांगी १०० ते २५०, तर सरासरी २०० व फ्लॉवर १५० ते ३५० सरासरी २२० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर, कोबीला २५ ते ४० तर सरासरी ३० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला १०० ते १८०, तर सरासरी दर १२५ रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT