In Parbhani, Dodaka 2000 to 3000 rupess per quintal
In Parbhani, Dodaka 2000 to 3000 rupess per quintal 
बाजारभाव बातम्या

परभणीत दोडका २००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता.६) दोडक्याची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला किमान २००० ते कमाल ३००० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

शेंगवर्गीय भाज्यामध्ये शेवग्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला किमान २५०० ते कमाल ४००० रुपये दर मिळाले. वाटाण्याची ४० क्विंटलची आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला २००० ते ३५०० रुपये दर मिळाले. गवारीची ९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला २५०० ते ४००० रुपये दर मिळाले. वालाची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ६०० ते १००० रुपये दर मिळाले. चवळीची ७ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला १५०० ते २५०० रुपये दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये मेथीच्या २५ हजार जुड्यांची आवक झाली. त्यांना प्रतिशेकड्याला किमान १०० ते कमाल १५० रुपये दर मिळाले. पालकाची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला ४०० ते ८०० रुपये दर मिळाले. शेपूची ३० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. चुक्याची ७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला १००० ते १५०० रुपये दर मिळाले.

कोथिंबिरीची ११० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ५०० ते १००० रुपये दर मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला किमान २००० ते कमाल २५०० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. काकडीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. गोल भोपळ्याची २० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ४०० ते ६०० रुपये दर मिळाले. वांग्यांची ६५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. 

टोमॅटो प्रतिक्रेट ४० ते ६० रुपये

टोमॅटोची ४५०० क्रेट आवक होऊन प्रतिक्रेटला किमान ४० ते कमाल ६० रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ४५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटलला किमान १५०० ते कमाल २५०० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची १० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटलला ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. भेंडीची २० क्विंटल आवक, तर दर २००० ते ३००० रुपये मिळाले. फ्लॅावरची ९० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटलला ३०० ते ६०० रुपये दर मिळाले. कोबीची ८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटलला ३०० ते ६०० रुपये मिळाले. 

कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीटरुटची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटलला १२०० ते १५०० रुपये दर मिळाले. मुळ्यांस शेकडा १०० ते २०० रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT