कांदा
कांदा  
बाजारभाव बातम्या

नाशिकला लाल कांद्याची आवक वाढली

ज्ञानेश उगले

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांदा शेवटच्या टप्प्यात असताना खरिपातील लाल कांद्याची आवक वाढली आहे. गत सप्ताहात लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, नामपूर या महत्त्वाच्या बाजार समित्यांत दररोज लाल कांद्याची सरासरी २० हजार क्विंटल आवक झाली. जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांतून दररोजची एक ते सव्वा लाख क्विंटल आवक झाली. या स्थितीत कांद्याला क्विंटलला १००० ते ३८८० व सरासरी २६०० रुपये दर मिळाले. गत सप्ताहाच्या सुरवातीला सोमवारी (ता. २७) लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची १७,७०० क्विंटल आवक झाली. या वेळी कांद्याला क्विंटलला १००० ते ३८८० व सरासरी ३५०१ असे दर निघाले. सोमवारनंतर मात्र सरासरी दरात ५०० ते ७०० रुपयांनी उतरण झाली. उन्हाळ कांदा संपला असताना, लाल कांद्याची आवक वाढली. यामुळे कांदा दर उतरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान केंद्र शासनाने ८५० डॉलर किमान निर्यात मूल्य (एमईपी) लावून अप्रत्यक्षपणे निर्यातबंदी केली. त्याचाही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे सांगितले जाते. देशातील कांद्याची मागणी पाहता त्या तुलनेत कमी आहे. मात्र व्यापाऱ्यांनी या वातावरणाचा फायदा उठवित बाजार पाडल्याचाही आरोप होत आहे. लाल कांद्याची आवक येत्या काळात वाढत राहणार असून, १६ डिसेंबरनंतर दरात काही प्रमाणात उतरण होण्याची शक्‍यता वर्तवली जात अाहे. या स्थितीत शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या सूत्रांनी केले. लासलगाव बाजार समितीतील कांद्याची  आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये) वार (तारीख)---आवक---किमान---कमाल---सरासरी सोमवार (ता. २७)---१७,७००---१०००---३८८०---३५०१ मंगळवार (ता. २८)---१९.७००---१५००---३७१५---२७१२ बुधवार (ता. २९)---१९,८२८---१००१---३४४१---२६५१ गुरुवार (ता. ३०)---२५.१०८---९५२---३३७०---२४५० शुक्रवार (ता. १)---२२०३८---१०००---३४७०---२५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

SCROLL FOR NEXT