Guar in Jalgaon: 1800 to 4200 rupees per quintal
Guar in Jalgaon: 1800 to 4200 rupees per quintal 
बाजारभाव बातम्या

जळगावात गवार १८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.१७) गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान १८०० ते कमाल ४२०० रुपये मिळाला. आवक यावल, जळगाव आदी भागांतून होत आहे. दर महिनाभरापासून स्थिर आहेत. 

बाजारात आल्याची २२ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान २००० ते कमाल ४६०० रुपये दर मिळाला. वांग्यांची १८ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ९०० ते १५०० रुपये असा मिळाला. हिरव्या मिरचीची २१ क्विंटल आवक झाली. मिरचीला प्रतिक्विंटल १४०० ते २००० रुपये दर मिळाला. बिटची नऊ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ९०० ते १७०० रुपये दर मिळाला.

लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १८०० ते २८०० रुपये दर होता. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १००० ते १४०० रुपये दर मिळाला. बटाट्याची २४० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ९०० ते १६०० रुपये दर होता. 

गाजराची आठ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान १००० ते कमाल १५०० रुपये दर मिळाला. कोबीची २१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ९०० ते १८०० रुपये मिळाला. भरताच्या वांग्यांची २१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान ८०० ते कमाल १३०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. तिला १४०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. 

डाळिंबांना २८०० ते ८००० रुपये

डाळिंबाची २१ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल किमान २८०० ते कमाल ८००० रुपये दर मिळाला. पालकाची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान १२०० रुपये मिळाला. टोमॅटोची २० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ५०० ते ८०० रुपये मिळाला. भेंडीची १७ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १४०० ते २२०० रुपये मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल किमान १६०० ते कमाल २४०० रुपये दर होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

Agriculture Technology : पर्यावरणपूरक इंधन कांडी, गॅसिफायर तंत्रज्ञान

Agriculture Technology : पेरणी यंत्र, उपकरणांची देखभाल

SCROLL FOR NEXT