Green chillies in Solapur, Pick up the cucumber 
बाजारभाव बातम्या

सोलापुरात हिरव्या मिरची, काकडीला उठाव

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, काकडी, गाजराला मागणी वाढली. त्यांचे दरही तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, काकडी, गाजराला मागणी वाढली. त्यांचे दरही तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात रोज हिरव्या मिरचीची ३० ते ६० क्विंटल, काकडीची २० ते ४० क्विंटल आणि गाजराची ३ ते ५ क्विंटल अशी आवक राहिली. गेल्या काही दिवसांत त्यांना फारशी मागणी नव्हती. पण, या पंधरवड्यात मागणीत वाढ झाली. त्यांची आवकही तुलनेने कमीच राहिली. त्यामुळे दर काहीसे तेजीत राहिले.

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये, काकडीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये, तर गाजराला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. 

वांगी, सिमला मिरची, गवार, दोडक्याच्या दरातही चांगली सुधारणा झाली. त्यांना मागणीही चांगली राहिली. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये, सिमला मिरचीला किमान ६०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये, गवारीला किमान १५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये, तर दोडक्याला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाला. 

कांदा दरात सुधारणा

कांद्यालाही या सप्ताहात चांगली मागणी राहिली. पण मागणीच्या प्रमाणात आवक नसल्याने दरात चांगलीच सुधारणा झाली. रोज ४० ते ६० गाड्यांपर्यंत आवक राहिली. कांद्याची सर्व आवक बाहेरील जिल्ह्यातून झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३२०० रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT