Green chilli arrivals in Nashik, rates stable 
बाजारभाव बातम्या

नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक, दर स्थिर   

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरवी मिरचीची आवक ३२४ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३,००० ते ४,१०० रुपयेतर सरासरी दर ३,५५० रुपये मिळाला.

टीम अॅग्रोवन

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरवी मिरचीची आवक ३२४ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३,००० ते ४,१०० रुपये तर सरासरी दर ३,५५० रुपये मिळाला. सध्या आवक कमी आहे. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

गत सप्ताहात मागणीच्या तुलनेत पालेभाज्या व फळभाज्यांची आवक सध्या कमी झाल्याचे चित्र आहे.मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने तेजीमुळे आवकेनुसार दर निघाले. वालपापडी-घेवड्याची आवक ७,२११ क्विंटल झाली. आवकेत वाढ झाल्याने दर कमी राहिले. वालपापडीला प्रति क्विंटल २,००० ते ४,००० असा तर सरासरी दर ३,००० रुपये राहिला. घेवड्याला प्रति क्विंटल ३००० ते ४,००० तर सरासरी दर ३,५०० रुपये राहिला. वाटाण्याची आवक ७० क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल १३,००० ते १,५००० तर सरासरी दर १,४००० रुपये राहिला. गाजराची आवक ३२६४ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ३,२०० ते ४,००० तर सरासरी दर ३,७०० रुपये राहिला.

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला २०० ते १,१०० तर  सरासरी ६००, वांगी ५०० ते ८,०० तर सरासरी ६५० व फ्लॉवर १२५ ते ३५० सरासरी २५० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ६०० ते ९०० तर सरासरी दर ७५० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा २०० ते ४५० तर सरासरी ३५५, कारले १५० ते २५० तर सरासरी २००, गिलके ३५० ते ४५५ तर सरासरी ३५०, दोडका २५० ते ४६० तर सरासरी दर ३२५ रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. 

कांद्याची आवक ७,०७२ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ७५० ते ३,००० मिळाला तर सरासरी दर २,३०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ५,०४१ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ४०० ते १,३५० तर सरासरी दर ७५० रुपये राहिला. लसणाची आवक १०६ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ३,००० ते ८,५०० तर सरासरी दर ७,००० रुपये राहिला. आद्रकची आवक २४३ क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ३,००० ते ४,५०० तर सरासरी दर ४,००० रुपये राहिला. फळांमध्ये चालू सप्ताहात केळीची आवक ७५६  क्विंटल झाली. तिला प्रति क्विंटल ८५० ते १,२५० तर सरासरी दर १,००० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ५,४८० क्विंटल झाली. मृदुला वाणास ५०० ते ११,००० तर सरासरी ८,००० रुपये दर मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

Canal Water Release : पाण्याचा प्रश्न ऐरणीवर: बंधारे भरण्यासाठी कॅनॉलमधून पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची आर्त हाक

SCROLL FOR NEXT