पुणे : आवळ्याला आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे घरगुती वापराबराेबर प्रक्रिया उद्याेगांकडून मागणी वाढत आहे. परिणामी दर देखील चांगले मिळत असून, पुणे बाजार समितीमध्ये आवळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या प्रति किलाेला १५ ते ३० रुपयांपर्यंत दर मिळत असून, यंदा उत्पादन चांगले असल्याचेही निरीक्षण बागा खरेदीदारांकडून नाेंदविले जात आहे.
बाजार समितीमधील आवळ्याचे आडतदार विलास निलंगे म्हणाले, की आवळ्याचा हंगाम साधारण दसऱ्यानंतर सुरू हाेताे. बाजार समितीमध्ये प्रामुख्याने राजस्थानसह सातारा, राहुरी, नगर आदी भागातून आवळ्याची आवक हाेत असते. सध्या हंगाम सुरू झाला असून राजस्थान येथून चकाया जातीच्या आवळ्याची दरराेज सुमारे २ टन तर स्थानिक आवक सुमारे २ टन आहे.
दिवाळीनंतर आवकेत आणि मागणी वाढ हाेते. या हंगामात दरराेज सुमारे १० ते १२ टन आवक हाेत असते. आवळ्याची राजस्थान येथील चकाया वाणाबराेबर राहुरी, नगर परिसरातून कृष्णा, कांचन आणि एन ए ७ जातींची आवक हाेत असते. यामधील एन ए ७ या वाणाला हिरवा रंग, चमकदार फळ, एकसारखा गाेल आकार असल्याने मागणी चांगली आहे. इतर वाणांपेक्षा या वाणाला प्रतिकिलाेला पाच ते सहा रुपये जास्त दर मिळत आहे.
आवळ्याच्या बागा खरेदी करुन पुरवठा करणारे आदिक बल्लाळ (जि. सातारा) म्हणाले, की मी गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील आवळ्याच्या बागा खरेदी करून बाजारपेठेत आवळा पाठवित असताे. यंदा १२ एकरांची ९०० झाडांची बाग खरेदी केली असून, या बागेतून ६० टन आवळा निघण्याचा अंदाज आहे. बाग खरेदी करण्याच्या महिनाभर अगाेदर झाडांची पाहणी करून माेहाेर आणि फळधारणेचा अंदाज घेऊन उत्पादनाच्या अंदाजानुसार दर ठरविताे. यंदा ही बाग ३ लाख ४० हजार रुपयांना खरेदी केली आहे.