पावसाळी भाजीपाल्यामुळे  ठोक बाजारातील दर कोसळले Due to the rainy season vegetables Wholesale market prices fell
पावसाळी भाजीपाल्यामुळे  ठोक बाजारातील दर कोसळले Due to the rainy season vegetables Wholesale market prices fell 
बाजारभाव बातम्या

पावसाळी भाजीपाल्यामुळे ठोक बाजारातील दर कोसळले

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यातील भाजीपाला बाजारात सध्या पावसाळी भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे ठोक बाजारासह किरकोळ बाजारातील पालेभाज्या व फळभाज्यांचे दर कोसळल्याची माहिती ठोक व्यापारी महमंद जावेद यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात बारमाही पाण्याची व्यवस्था नसलेले शेतकरी दर वर्षी पावसाळ्यात भाजीपाल्याची लागवड करतात. हा भाजीपाला जुलै-ऑगष्टमध्ये बाजारात येतो. त्यामुळे नांदेड शहरासह ग्रामीण भागातील ठोक बाजारात आवक वाढल्याने दर कोसळतात. सध्या नांदेड शहरातील इतवारा तसेच तरोडा नाका भागातील ठोक बाजारातही आवक वाढली आहे. त्यामुळे सर्वच भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. परिणामी आठवडे बाजारातही भाजीपाला स्वस्त झाल्याची माहिती शिवणी जामगा (ता. लोहा) येथील शिवाजी जामगे यांनी दिली. तर ठोक बाजारात भाजीपाल्याचे दर निम्यावर आल्याचे व्यापारी महमंद जावेद यांनी सांगितले.

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण (दर प्रतिक्विंटल) मागील पंधरा दिवसांपासून ठोक बाजारात विविध भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. यात टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. चारशे ते पाचशे रुपये क्विंटलचा मिळणार भाव सध्या प्रति क्विंटल ऐंशी रुपये ते सव्वाशे रुपयांवर आला आहे. तर गवार शंभर रुपये किलो, कारले दोनशे रुपये, दोडकी दीड हजार ते दोन हजार, हिरवी मिरची आठशे ते हजार रुपये, पत्ताकोबी पाचशे ते हजार, भेंडी आठशे ते अकराशे, वांगी दीड हजार ते दोन हजार, शिमला मिरची एक हजार, चवळी एक हजार ते बाराशे, फ्लॉवर दीड ते  दोन हजार, पालक पाचशे रुपये प्रति शेकडा, शेपू चारशे रुपये प्रति शेकडा, मेथी आठशे ते एक हजार रुपये प्रति शेकडा या दराने विक्री होत आहे.

प्रतिक्रिया पावसाळी भाजीपाला बाजारात आल्यानंतर दर वर्षी भाजीपाला तसेच फळभाज्यांचे दर कमी होतात. यंदा नियमित शेतकऱ्यांनीही भाजीपाला लागवड वाढविल्यामुळे आवक वाढून दर कोसळले आहेत. - महमंद जावेद, ठोक भाजीपाला व्यापारी, नांदेड

प्रतिक्रिया

मागील पंधरा दिवसापासून भाजीपाल्यांचे दर कमी झाल्याने उत्पादन खर्चही निघत नाही, उलट जाण्या-येण्याचीही पदरमोड करावी लागत आहे. - शिवजी जामगे, शिवणी जामगा, ता. लोहा, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Seed : कपाशीच्या बियाण्यांसाठी तेलंगणाची वारी

Bribe Arrest : निलंबन रद्द करण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची मागणी

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

SCROLL FOR NEXT