Cucumber in the state 500 to 2500 rupees 
बाजारभाव बातम्या

राज्यात काकडी ५०० ते २५०० रुपये

पुणे ः ‘‘गुलटेकडी येथील बाजार समितीत गुरुवारी (ता. १८) काकडीची सुमारे ८ टेम्पो आवक झाली. या वेळी दहा किलोला १५० ते २०० रुपये दर होते.

टीम अॅग्रोवन

पुण्यात क्विंटलला १५०० ते २००० रुपये

पुणे ः ‘‘गुलटेकडी येथील बाजार समितीत गुरुवारी (ता. १८) काकडीची सुमारे ८ टेम्पो आवक झाली. या वेळी दहा किलोला १५० ते २०० रुपये दर होते.

आवक प्रामुख्याने पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत आहे. उन्हाळ्यामुळे काकडीची मागणी वाढली आहे. आवक आणि मागणी संतुलीत असल्याने दर देखील संतुलीत आहेत’’, असे आडते असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी सांगितले. 

दरम्यान, मुंबई बाजार समितीमध्ये गेल्या पंधरवड्यात काकडीचे दर ३२० रुपयांपर्यंत गेले होते, अशी माहिती शेतकरी पंढरीनाथ पारखे (रा, धामणखेल, ता.जुन्नर) यांनी दिली.  ते म्हणाले, ‘‘यंदा दोन एकरवर काकडीची लागवड केली. १५ दिवस झाले काकडीची तोडणी सुरू आहे. आमची सर्व काकडी वाशी बाजार समितीमध्ये पाठवली जाते. सध्याचा दर हा १५० ते १८० रुपये मिळत आहे.’’ 

जळगावात क्विंटलला १२०० ते २२०० रुपये 

जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १८) काकडीची २१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते २२०० व सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. आवक जामनेर, एरंडोल, यावल, जळगाव आदी भागातून होत आहे. आवक सध्या वाढली आहे. कोरोनामुळे बाजारातील लिलाव, पणन व्यवस्थेवर परिणाम झाल्याने दरावर दबाव वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

सोलापुरात क्विंटलला ८०० ते १५०० रुपये

सोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात काकडीच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झाली. काकडीला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १००० रुपये, सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात काकडीची आवक रोज १० ते २० क्विंटलपर्यंत झाली. ही आवक स्थानिक भागातूनच झाली. या आधीच्या सप्ताहातही काकडीची आवक तशी जेमतेमच राहिली. प्रतिदिन १० ते १५ क्विंटलपर्यंत ती राहिली.

काकडीला प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी ९०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला. पंधरवड्यापूर्वीही दरामध्ये असाच काहीसा चढ-उतार राहिला. त्यावेळीही आवक १० ते १२ क्विंटलपर्यंत राहिली. तर दर प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १४०० रुपये असा दर मिळाला. १०० ते २०० रुपयांच्या फरकाने या आठवड्यात दरात काहीशी सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

अकोल्यात क्विंटलला ५०० ते १००० रुपये

अकोलाः उन्हाळ्यात दरवर्षी भाव मिळवणारी काकडी यंदा कोरोनाच्या तडाख्यात सापडली आहे. दर्जेदार माल असूनही अवघा ५०० ते १००० रुपयांदरम्यान विकत आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च तर दूरच वाहतुकीचे भाडेही निघणे कठीण झाले आहे. बाजारात उठाव नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

उन्हाळ्यात या काळात दरवर्षी काकडी १५०० ते २००० रुपयांदरम्यान विक्री होत असते. ग्राहकांकडून मागणी राहत असल्याने शेतकरी काकडीची लागवड करतात. यंदाच्या हंगामातील लागवड असलेली काकडी सध्या मोठ्या प्रमाणात विक्रीला आली आहे. दररोज येथील बाजारात ५० क्विंटलपर्यंत आवक होते. परंतु दरच नसल्याने अडचण झाली आहे.

आठवडी बाजार बंद आहेत. शहरात भाजीपाला विक्रीला वेळेची मर्यादा घातली आहे. याचा फटका काकडीलाही बसत आहे. छोटे व्यापारी, ग्राहकांकडून उठाव होत नाही. गुरुवारी झालेल्या आवकेतील काही माल विक्री होऊ शकलेला नाही, अशी माहितीही विक्रेत्यांनी दिली.

नाशिकमध्ये क्विंटलला १५०० ते २५०० रुपये

नाशिक : येथील बाजार समितीत बुधवारी (ता.१७) काकडीची आवक ५७३ क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० रुपये राहिला.

बाजार समितीत सप्ताहाच्या सुरवातीला आवक कमी असल्याने दरात तेजी दिसून आली. मात्र गेल्या तीन दिवसात आवकेत वाढ झाल्याने दर पुन्हा सर्वसाधारण झाले आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

मंगळवार (ता.१६) काकडीची आवक ७२८ क्विंटल होती. तिला प्रतिक्विंटल १५०० ते २५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० राहिला. सोमवारी (ता.१५) काकडीची आवक ४७३ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १२५० ते २१२५ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १७५० रुपये राहिला. 

नगरमध्ये क्विंटलला १००० ते २००० रुपये 

नगर ः येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत काकडीला प्रतिक्विंटल १ हजार ते २ हजार रुपयांचा दर मिळाला. येथे दर दिवसाला ३५ ते ४५ क्विंटलची आवक होत आहे. 

नगर बाजार समितीत १४ मार्च रोजी ११ क्विंटलची आवक झाली. १ हजार ५०० ते २ हजार रुपये व सरासरी १७५० रुपयांचा दर मिळाला. ९ मार्च रोजी ४० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार रुपये व सरासरी १ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला.  सहा मार्च रोजी २७ क्विटंलची आवक होऊन १ हजार ते १ हजार ८०० व सरासरी १४०० रुपयांचा दर मिळाला. २३ फेब्रुवारी रोजी ५० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १ हजार ८०० रुपये १ हजार ४०० रुपयांचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

परभणीत क्विंटलला ७०० ते १२०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे- भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १८) काकडीची ७० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल किमान ७०० ते कमाल १२०० रुपये, तर सरासरी ९५० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून तसेच हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून काकडीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी काकडीची ४० ते ७० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल ६०० ते २००० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.१८) काकडीची ७० क्विंटल आवक असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये होते. किरकोळ विक्री प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने सुरु होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT