चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची उलाढाल 
बाजारभाव बातम्या

चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची उलाढाल

चाकण बाजार आवारात लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदा जनावरांचा बैल, गायी, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदींचा बाजार भरला. या बाजारात दीडशे बैल विक्रीसाठी आले होते. त्यातील नव्वद बैलांची विक्री झाली. एका बैलाला दहा ते पस्तीस हजार रुपये भाव मिळाला.

टीम अॅग्रोवन

चाकण, जि. पुणे : येथील महात्मा फुले बाजार आवारात लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदा जनावरांचा बैल, गायी, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदींचा बाजार भरला. या बाजारात दीडशे बैल विक्रीसाठी आले होते. त्यातील नव्वद बैलांची विक्री झाली. एका बैलाला दहा ते पस्तीस हजार रुपये भाव मिळाला. सुमारे सात हजार शेळ्या, मेंढ्यांची आवक झाली त्यातील साडेपाच हजार शेळ्या, मेंढ्यांची विक्री झाली. बाजारात सुमारे सत्तर लाखांची उलाढाल झाली, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली. कोरोनाच्या साथीत गेल्या वर्षभरापासून जनावरांचा आठवडे बाजार बंद होता. त्यामुळे शेतकरी, जनावरांची खरेदी, विक्री करणारे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. चाकण येथील जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. या बाजारात अगदी कर्नाटक राज्यातून बैल विकण्यासाठी व्यापारी येत असतात. तसेच राज्यातील कोकणभाग, पंढरपूर आदी भागातून बैल खरेदी, विक्री करण्यासाठी शेतकरी, व्यापारी येतात. सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू झाल्याने बैलांना मागणी वाढली आहे, तसेच भावही वाढले आहेत. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर हा पहिला बाजार असल्याने शेतकरी, व्यापारी यांनी गर्दी केली होती. परंतु बाजार समितीने कोरोनाचे नियम पाळून गर्दीवर नियंत्रण ठेवले जात असल्याचे सभापती घुमटकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT