गवार
गवार 
बाजारभाव बातम्या

साताऱ्यात वाटाणा, वांगी, गवार तेजीत

विकास जाधव
सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात वाटाणा, गवारी, वांगीचे दर तेजीत होते. टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. वाटाण्याची आवक दहा क्विंटल होती. वाटाण्यास ५००० ते ७००० रुपये, तर सरासरी ६००० रुपये क्विंटल दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आहे.
 
बाजार समितीत वांग्याची ५० क्विंटल आवक झाली. वांग्यास २००० ते २५०० रुपये, तर सरासरी २२०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. भेंडीची ३१ क्विंटल आवक झाली. भेंडीला २००० ते ३००० रुपये, तर सरासरी २५०० रुपये क्विंटल दर मिळाला. गवारीची ४३ क्विंटल आवक झाली. गवारीस २००० ते ४००० रुपये, तर सरासरी ३००० रुपये क्विंटल दर मिळाला. फ्लॉवर व ढोबळी मिरचीचे स्थिर होते. फ्लॉवरची ३१ क्विंटल आवक झाली.
 
फ्लॉवरला १००० ते ३००० रुपये, तर सरासरी २००० रुपये क्विंटल दर मिळाला. टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. टोमॅटोची १४६ क्विंटल आवक झाली. टोमॅटोस ६०० ते १००० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल दर मिळाला.
 
पालेभाज्यात मेथी व कोथिंबिरीचे दर तेजीत होते. मेथीची दैनंदिन एक ते दीड हजार जुड्या आवक होत असून, शेकड्यास १००० ते १५०० दर मिळाला. कोथिंबिरीची दैनंदिन १००० ते १२०० जुड्या आवक होत आहे. कोथिंबिरीस शेकड्यास ८०० ते १२०० रुपये दर मिळाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Summer Groundnut Sowing : उन्हाळी भुईमुगाची लागवड यंदा कमी प्रमाणात

Summer Sowing : नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात २७ हजार हेक्टरवर पेरणी

Gharkul Scheme : महिलांच्या सन्मानासाठी घरकुलाचे काम पूर्ण करा

Summer Heat : वाढत्या तापमानामुळे पिकांना फटका सुरूच

Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

SCROLL FOR NEXT