Pune ZP Election Agrowon
ताज्या बातम्या

Election : झेडपीची आरक्षण सोडत उद्या होणार

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद गट आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : जिल्हा परिषदेचे ८२ गट, तर १६४ पंचायत समितीचे गण निश्चित झाले असून, अंतिम प्रभाग रचनाही (ZP Ward) प्रसिद्ध झाली आहे. आता बुधवारी (१३ जुलै) रोजी आरक्षण सोडत (Reservation Declaration) होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद (Pune Zilla Parishad) व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या राज्यातील सत्तांतरानंतर ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा हा मार्गी लागणार का, याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे या आरक्षण सोडतीकडे राजकीय नेत्यांचे आणि इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद गट आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. १५ जुलै रोजी आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. १५ ते २१ जुलै दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. २५ जुलैला हरकती व सूचना राज्य निवडणूक आयोगाला सादर केले जाणार आहेत. २९ जुलै रोजी आरक्षणास मान्यता देण्यात येणार आहे. २ ऑगस्ट रोजी आरक्षणाचे राजपत्र प्रसिद्ध होणार आहे.

आरक्षित गट, गण संख्या :

पुणे जिल्हा परिषदेचे ८२ गट आणि १६४ गण आहेत. यातील ४१ गण महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. अनुसूचित जातींसाठी आठ गट आरक्षित असून, त्यातील चार गट महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील सहा गट आरक्षित आहेत. त्यातील तीन महिलांसाठी आरक्षित आहेत. सर्वसाधारण गटातील ६८ गट असून त्यातील ३४ गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहेत. पंचायत समित्यांचे १६४ गण आहेत. त्यातील ८२ जागा महिलांसाठी असून एकूण गणांपैकी १३९ गण सर्वसाधारण आहेत. त्यातील ६८ जागा महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. अनुसूचित जातीसाठी एकूण १५ गण आहेत, त्यातील नऊ गण महिलांसाठी, तर अनुसूचित जमातीकरिता एकूण दहा गण आरक्षित असून त्यातील पाच गण महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT