Soybean  Agrowon
ताज्या बातम्या

Soybean : पिवळ्या मोझॅक रोगाचा सोयाबीनवर प्रादुर्भाव

शिरोळ तालुक्यात आगाप लागवड केलेल्या सोयाबीनवर पिवळ्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. दानोळी कवठेसार परिसरातील एकूण सोयाबीन क्षेत्राच्या पन्नास टक्के क्षेत्रावर या रोगाचा हल्ला झाला आहे.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात आगाप लागवड (Soybean Cultivation) केलेल्या सोयाबीनवर पिवळ्या मोझॅक रोगाचा (Yellow Mosaic On Soybean) प्रादुर्भाव झाला आहे. दानोळी कवठेसार परिसरातील एकूण सोयाबीन क्षेत्राच्या (Area Of Soybean) पन्नास टक्के क्षेत्रावर या रोगाचा हल्ला झाला आहे.

शेतकऱ्यांनी रोगनियंत्रण करण्यासाठी त्याच्यावर औषधाची फवारणी केली आहे. तरीही आवश्यक तेवढा सकारात्मक परिणाम होताना दिसत नाही. याची पाहणी करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक पिसाळ, डॉ. रवी कारंडे, उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, कृषी पर्यवेक्षक संपतराव मुळीक, कृषी सहायक ज्योती भाटे यांनी भेट देऊन उपाययोजना सांगितल्या.

रस शोषणाऱ्या किडीचा बंदोबस्त करावा. त्यासाठी कीटकनाशकाचा उलटा नोझल वापरून पानाखालून फवारणी, शेतात पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर, नत्रयुक्त खतांचा संतुलित प्रमाणात वापर, आर्द्रता वाढल्यास बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी बरशानाशकची फवारणी असा उपायोजना शेतकऱ्यांना सांगितल्या. त्यांनी दानोळी, कवठेसार व शिरोळ तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

APMC Cess Cancellation: बाजार समित्यांच्या सेस रद्दबाबत तोडगा काढू; पणनमंत्री रावल

Sugar Stock Controversy: साखरेच्या ४८ लाख टनांचा हिशेब द्या; राजू शेट्टींचा केंद्र सरकारला सवाल

Pune Monsoon Situation: पश्चिम पुण्यात पावसाची उघडीप; पूर्व भागात प्रतीक्षा

MPSC Agriculture Service Issue: कृषी सेवा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी करणार आंदोलन

SCROLL FOR NEXT