नगर : भारतीय एकात्मिक शेती संस्था, मोदीपुरम व महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV Rahuri) राहुरी येथील अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक शेती (Integrated Farming) या विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळेचे आयोजन (Conducting agriculture workshops) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे १८ ते २१ जानेवारी, २०२३ या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे.
या द्विवार्षिक कार्यशाळेसाठी भारतातील २५ राज्य/केंद्रसशासित प्रदेशातून १६० शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती प्रकल्पाचे भारतामध्ये २५ मुख्य केंद्रे, ११ उपकेंद्रे तसेच शेतकऱ्यांच्या शेतावरील योजना यांची ३२ केंद्रे आहेत.
या कार्यशाळेमध्ये विविध पीकपद्धती, सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती या विषयावर बद्धिमंथन करण्यात येणार आहे.
१८ जानेवारीला होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमासाठी कृषी विद्या, कृषी वानिकी आणि वातावरण बदलाचे नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. एस. भास्कर, मोदीपूरम येथील भारतीय शेती पद्धती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. एस. पनवार हे उपस्थित राहणार असून २१ जानेवारीला होणाऱ्या समारोप कार्यक्रमासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विभागाचे उपमहासंचालक डॉ. एस. के. चौधरी उपस्थित राहणार आहे.
या कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार आणि कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याची माहिती एकात्मिक शेती पद्धतीचे प्रमुख कृषी विद्यावेत्ता डॉ. उल्हास सुर्वे यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.