Millet Festival Agrowon
ताज्या बातम्या

Millet Festival : ‘उमेद’च्या प्रशिक्षणातील ज्ञानाचा महिलांनी लाभ घ्यावा

Millet Year : ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या मिलेटस खाद्यपदार्थाच्या महोत्सवाचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते झाले.

Team Agrowon

Solapur News : ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या मिलेटस खाद्यपदार्थाच्या महोत्सवाचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते झाले. या वेळी महिला बचत गटांनी उमेदमधील प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रकल्प संचालक अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सचिन चवरे, महेंद्र महाजन उपस्थित होते. या वेळी बचत गटातील महिलांशी संवाद साधताना आव्हाळे म्हणाल्या की, उमेद बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम चांगला असून या प्रशिक्षणाचा फायदा महिला बचत गटांनी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे पॅकेजिंग उत्कृष्टपणे करून मार्केटिंग ही करण्याच्या तंत्राचा अवलंब करावा.

व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे असे आवाहन केले. कासाळगंगा नदीकाठच्या पंढरपूर, सांगोला तालुक्यातील बचतगटांच्या महिलांना आत्माच्या माध्यमातून सगरोळी (जि. नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्रातून ‘मिलेटस’ खाद्यपदार्थांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. उत्पादनासोबत पॅकिंग, मार्केटिंगची माहिती देण्यात आली आहे.

प्रदर्शनातील आरोग्यदायी खाद्यपदार्थ

ज्वारीची शेव, शंकरपाळ्या, चकली, बिस्कीट, लाडू

नाचणीचे बिस्कीट, लाडू, ज्वारी व बाजरीचे मिक्स सूप

थालीपीठ भाजणी, दलिया, मिक्स बाजरी थालीपीठ

बाजरी व ज्वारीच्या लाह्या

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT