Abdul Sattar Agrowon
ताज्या बातम्या

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांविरोधात मंत्रालयावर महिला मोर्चा

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वापरलेल्या अपशब्दाचे पडसाद पुन्हा एकदा मंगळवारी (ता. १५) मंत्रालयात उमटले.

Team Agrowon

मुंबई : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वापरलेल्या अपशब्दाचे पडसाद पुन्हा एकदा मंगळवारी (ता. १५) मंत्रालयात उमटले. राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसच्या महिला आघाडीने मंत्रालयावर मोर्चा काढत निदर्शने केली.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयासमोर व मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरील अब्दुल सत्तार यांच्या दालनाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त होता. या वेळी महिलांनी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मंगळवारी अचानक महिला आघाडीने प्रदेश कार्यालयातून मंत्रालयाकडे मोर्चा काढला. सत्तार यांच्याविरोधात घोषणा देत कार्यकर्त्या मोठ्या संख्येने मंत्रालयाकडे येत होत्या. काही महिला पोलिसांना गुंगारा देत टॅक्सीमधून मंत्रालयाजवळ आल्या. पायी मंत्रालयाकडे जाणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ अडवून ताब्यात घेतले.

बैठकीत महिला आक्रमक

मोर्चाआधी महिला आघाडीची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सत्तार यांच्या विधानावरून महिला आक्रमक झाल्या. या बैठकीनंतर महिला मोर्चाने मंत्रालयाकडे आल्या. या बैठकीला राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, विद्या चव्हाण, रूपाली चाकणकर, आमदार सुमन पाटील आदी उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT