Women Empowerment Agrowon
ताज्या बातम्या

Women Empowerment : राष्ट्र विकासासाठी महिला सक्षमीकरण आवश्यक

भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून पुढे यावयाचे असेल तर महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण अतिशय आवश्यक आहे.

Team Agrowon

जालना : ‘‘भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून पुढे यावयाचे असेल तर महिला सबलीकरण (Women Empowerment), सक्षमीकरण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण (Economic Empowerment) अतिशय आवश्यक आहे. ज्या कुटुंबात महिलांचा मान-सन्मान राखला जातो आणि त्यांच्या प्रगती विषयक बाबींकडे लक्ष दिले जाते, तेच कुटुंब समाजात एक आदर्श कुटुंब म्हणून पुढे येते.

येणाऱ्या काळात विविध क्षेत्रात महिलांना संधी उपलब्ध होत आहेत. त्यांनी संघटितपणे वाटचाल केली पाहिजे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

विस्तार शिक्षण संचालनालय, कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी, नाबार्डतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.३) बदनापूर येथे महिला शेतकरी मेळावा घेण्यात आला.

अन्नमाता-सेंद्रिय शेती संशोधक व प्रसारक ममताबाई भांगरे, डॉ. डी. बी. देवसरकर, डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. डी. एन. गोखले, प्राचार्य डॉ. जया बंगाळे, उमेश कहाते, तेजल क्षीरसागर उपस्थित होत्या.

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतिशील महिला, महिला उद्योजिका आणि शास्त्रज्ञांचा या वेळी सत्कार करण्यात आला. डॉ. स्मिता सोळंकी यांना उत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून या वेळी गौरविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT