Chana Disease  Agrowon
ताज्या बातम्या

Chana Disease : हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव

यंदा सिंचनाची सोय असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिके काढून हरभऱ्याची लागवड केली. अतिपावसाने आधीच खरीप हंगामातील पिकांचेही या भागात प्रचंड नुकसान झाले होते.

Team Agrowon

तेल्हारा, जि. अकोला ः तालुक्यात यंदाच्या रब्बीत लागवड (Rabi Chana) केलेल्या हरभरा पिकावर (Chana Crop) बहुतांश भागात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव (Chana Disease) वाढलेला आहे.

परिणामी या रोगांना पायबंद करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी ओढाताण सुरू आहे. महागड्या किडनाशकांच्या फवारण्या करूनसुद्धा रोगावर संपूर्ण प्रतिबंध होत नसल्याने हरभरा उत्पादक चिंतातूर झालेला आहे.Chana

यंदा सिंचनाची सोय असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिके काढून हरभऱ्याची लागवड केली. अतिपावसाने आधीच खरीप हंगामातील पिकांचेही या भागात प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर रब्बीकडून अपेक्षा लागून होती.

मात्र, रब्बीतील हरभरा या प्रमुख पिकावर सध्या मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने नुकसान होत आहे. हरभऱ्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस सतत ढगाळ वातावरण झालेले होते.

या वातावरणामुळे पिकावर बुरशीजन्य रोगांचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढला होता. परिणामी हरभऱ्याचे पीक धोक्यात आलेले आहे. उपाययोजना करताना शेतकरी हतबल झाला आहे.

मी दहा एकर क्षेत्रावर हरभरा लागवड केली आहे. मात्र हरभरा पेरणीपासूनच आधी रानडुक्करानी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आणि आता हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला. पिकावर संकटांची मालिका कायम आहे.

- पकंज आढे, शेतकरी, दापुरा, ता. तेल्हारा, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT